शिवसेनेने भाजपसोबत संसार नीट चालतो का ते बघावे

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा टोला

 मुंबई : प्रतिनिधी

शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी आधी भाजपसोबतचा संसार नीट चालतो का ते बघावे आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसवर टिका करावी असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला.

शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर असभ्य भाषेत टीका केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना नवाब मलिक यांनी सेनेचे मंत्री रामदास कदम यांचा आणि भाजपाचा चांगलाच समाचार घेतला.

शिवसेनेचा भाजपसोबतचा मांडलेला संसार धड चालत नाही. अहमदनगरमध्ये ज्यांनी पक्षाचा आदेश पाळला नाही. त्यांच्यावर कारवाई केली जाईलच. परंतु आधी शिवसेनेने भाजपसोबतचा संसार नीट कसा चालेल की घटस्फोट होणार याचंही उत्तर जनतेला हवं असल्याचे ते म्हणाले.

About Editor

Check Also

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे ९ निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे निर्णय

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. या बैठकीत पुण्यात होणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *