भाजपाच्या टोकाच्या जातीयवादाला धर्मनिरपेक्षवादाने उत्तर देवू राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ग्वाही

मुंबई: प्रतिनिधी

या देशात भाजप जो टोकाचा जातीयवाद करतो आहे त्याला जातीयवादाने उत्तर नाही तर धर्मनिरपेक्षवादाने उत्तर देवू शकतो असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रदेश कार्यालयात केले.

लातूर जिल्हयातील उदगीर नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जाहिर प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील हे मार्गदर्शन करताना बोलत होते.

अल्पसंख्याक समाजातील मान्यवर नेते व कार्यकर्ते मधल्याकाळात भावनेच्या भरात एमआयएम या पक्षात गेले होते. त्या सर्वांच्या लक्षात आले की, एमआयएमचा दुरुपयोग भाजप सत्तेत टिकण्यासाठी करत आहे. भाजपाचे हितसंबंध जपण्यासाठी एमआयएमला उभं करुन अल्पसंख्याक समाजाची मते डिव्हाईड करुन भाजपचा विजय होण्यासाठी मदत होते आहे हे लक्षात आले. ही चूक पुन्हा होणार नाही म्हणून एमआयएममधील अनेक कार्यकर्ते, अनेक शहरात, जिल्हयात राष्ट्रवादीत येत आहेत. ही ताकद वाढत असताना अल्पसंख्याक समाजाने पाठिंबा दिला तर ही ताकद आणखी वाढायला मदत होईल असे सांगतानाच आपल्या हितसंबंधांना बाधा पोचणार नाही. नगरपरिषदेत आपल्या हिताचे संरक्षण होईल असा विश्वास त्यांनी प्रवेश केलेल्या नगरसेवकांना दिला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या सर्व नगरसेवकांचे जयंत पाटील यांनी पक्षात स्वागत केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदगीर नगरपंचायतीतील एमआयएमच्या पाच नगरसेवकांनी व कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, राज्यमंत्री संजय बनसोडे, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण आदी उपस्थित होते.

एमआयएमचे लातूर जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सय्यद ताहीर हुसेन, नगरसेवक जरगर शमशोद्दीन, नगरसेवक शेख फयाज नसोरोद्दिन, नगरसेवक हाश्मी इमरोज नुरोद्दीन, नगरसेवक इब्राहिम पटेल (नाना) यांच्यासह शेख अहेमद सातसैलानी, महंमदरफी भाई, सय्यद अन्वर हुसेन, शेख अजीम दायमी, शेख अबरार, सय्यद सोफी आदींनी प्रवेश केला.

About Editor

Check Also

औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीप्रकरणी आरोपांवर एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा खुलासा एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी वैयक्तिक आरोप झाल्यानंतर खुलासा केला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून माझ्याविरोधात वैयक्तिक आरोप करण्यात येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *