अजित पवारांनी आत्राम यांचा मुद्दा उपस्थित करताच मुख्यमंत्र्यांनी लगेच दिले आश्वासन नक्षलवादाला घाबरून गडचिरोलीतला औद्योगिक विकास थांबणार नाही

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सीमावाद आणि कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांच्या विरोधात सुर केलेल्या कारवाईवरून शिंदे-फडणवीस सरकारला घेरले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारम्याची धमकी देण्यात आल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला. त्यावर तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत सुरक्षा पुरविण्याचे आश्वासन दिले.

नक्षलवादाला घाबरून गडचिरोलीतला औद्योगिक विकास थांबणार नाही अशी ग्वाही देतानाच सुरजागड स्टील प्रकल्पामुळे सुमारे सहा हजार जणांना रोजगार मिळाला आहे. विधानसभा सदस्य धर्मराव बाबा आत्राम यांना आवश्यक ती सुरक्षा पुरविण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य आत्राम यांना मिळालेल्या धमकीबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य दिलीप वळसे पाटील, नाना पटोले, जितेंद्र आव्हाड यांनी मुद्दा उपस्थित केला होता.

यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड स्टील प्रकल्पामुळे या भागाचा विकास होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे सहा हजार जणांना रोजगार मिळाला असून कोनसरी येथील प्रकल्प उभारल्यानंतर दहा हजार जणांना रोजगार मिळेल, असेही सांगितले.

विधानसभा सदस्य आत्राम यांच्या सुरक्षेत कुठलीही कमतरता राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

About Editor

Check Also

बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे स्टार प्रचारक जाहीर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ४० नेत्यांचा समावेश

बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या प्रचारासाठी भाजपाच्या केंद्रीय कार्यालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *