मुंबईः प्रतिनिधी अॅन्टालिया बंगल्याजवळ स्फोटक सापडल्याप्रकरणी अटक झालेल्या मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे प्रकरणावरून भाजपाकडून सातत्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. त्याता आता महाविकास आघाडी सरकारचे नामकरण करत “हुकूमशाही ठाकरे सरकार” अशी उपहासात्मक उपमा ट्विट करत दिली. हि स्फोटक ज्या गाडीत आढळून आले. त्या गाडीचा …
Read More »फडणवीसांचा गौप्यस्फोट, वाझेसाठी उध्दव ठाकरेंनी मला फोन केला मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर थेट निशाना
नवी दिल्ली: प्रतिनिधी मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे किंवा मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीर सिंग हे फार लहान आहेत. त्यामुळे केवळ पोलिस आयुक्तांची बदली करून चालणार नाही, तर सचिन वाझे यांना ऑपरेट करणारे किंवा त्यांचे राजकीय हँडलर कोण, याचा शोध घेतला पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज …
Read More »हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे! देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत?
मुंबई: प्रतिनिधी अँटिलियासमोरील स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याचे प्रकरण व हिरेन मृत्यू प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते बेफामपणे कोणत्याही पुराव्याशिवाय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर आरोप करत आहेत. आता एनआयएने जप्त केलेल्या मर्सिडीस गाडीतून १७ फेब्रुवारी रोजी मनसुख हिरेन यांनी प्रवास केला होता असे म्हटले जाते. सदर गाडीबरोबर एका फोटोत ठाणे भाजपाचा …
Read More »केवळ पोलीस आयुक्तांची बदली नको, गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी
मुंबईः प्रतिनिधी सचिन वाझे यांची पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने आता मुंबई पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांची बदली करून मोठी कारवाई केल्याचा आव आणला असला तरी ही कारवाई म्हणजे वरवरची मलमपट्टी आहे. राजकीय आशिर्वादामुळे एक पोलीस अधिकारी सरकारी यंत्रणा वापरून गुन्हे करत असल्याचे चित्र निर्माण झाले असून राज्यातील कायदा …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंच्या या मागणीला पंतप्रधान मोदींचा सकारात्मक प्रतिसाद कोविडचा संसर्ग थोपविण्यासाठी नव्या उत्साहाने पूर्णपणे सज्ज मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना ग्वाही
मुंबई : प्रतिनिधी गेल्या वर्षीप्रमाणे आता देखील कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी अतिशय काटेकोर पाऊले उचलण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देत अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी मिळावी जेणेकरून लसीकरणाचा वेग वाढवता येईल तसेच हाफकिनला लस उत्पादन करण्याची मान्यता मिळावी अशी विनंतीही ठाकरे यांनी केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांची सूचना लगेचच उचलून …
Read More »अजित पवार म्हणाले, काट्याने काटा काढायचा असतो सीताराम गायकर यांच्यासह अकोले तालुक्यातील सहकार क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
मुंबई: प्रतिनिधी वैभव पिचडला खूप समजावण्याचा प्रयत्न केला होता. तुमचं भवितव्य आहे, परंतु काय झालं माहित नाही त्याने पक्षप्रवेश केला. ग्रामीण भागात काटयाने काटा काढायचा असतो ही म्हण प्रचलित आहे. त्यानुसार किरण लहामटे यांना उमेदवारी दिली आणि राष्ट्रवादीचा आमदार मिळाला. राष्ट्रवादीचा आमदार यावा म्हणून प्रयत्न झाला. नगर जिल्हयात चांगली साथ …
Read More »नागरी अंगणवाडी मदतनीसांच्या पदोन्नतीसाठी अटी, शर्तीमध्ये सुधारणा महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे आदेश
मुंबई : प्रतिनिधी एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत नागरी क्षेत्रातील अंगणवाडी मदतनीसांना न्याय देण्यासाठी पदोन्नतीच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने अटी व शर्तींची योग्य पडताळणी करुन सुधारणेचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस …
Read More »केंद्राने महाराष्ट्राला नाहीतर पाकिस्तानला केला कोरोना लसीचा पुरवठा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. आटोक्यात आलेले कोरोनाचे संकट पुन्हा गंभीर होत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनला असताना केंद्र सरकार महाराष्ट्राला कोरोनाच्या लसीकरणासाठी पुरेशा लस मुद्दामहून उपलब्ध करून देत नाही हे दुर्दैवी आहे. दुसरीकडे केंद्र सरकार पाकिस्तानला कोरोना लस पुरवत आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी …
Read More »सरदेसाईंचा पलटवार, मी उच्च शिक्षित तर राणेंची पार्श्वभूमी फडणवीसांनी सांगितलीय राणेंच्या आरोपावर सरदेसाईंचे उत्तर
मुंबई: प्रतिनिधी मी मुंबईत दहावी, १२ वीच्या परिक्षेत डिस्टींक्शन मिळविले होते. त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या इंजिनियअरींगच्या अभ्यासक्रमात आणि ज्या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिकले त्या परदेशातील कॉलेजमध्येही मी डिस्टींक्शनमध्ये उच्च शिक्षण घेतले आहे. त्यामुळे मला भाजपाचे आमदार नितेश राणे आरोप केल्याप्रमाणे मला तशी कोणतीही गोष्ट करण्याची गरज नसल्याचे सांगत केवळ माझे राजकिय …
Read More »आरोग्य मंत्री टोपे म्हणाले की, लॉकडाऊन नाही तर कडक निर्बंध राज्यात ८५ टक्के रूग्णांना लक्षणे नाहीत
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यास भाग पाडू नका असा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिला. परंतु राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात नागरिकांना दिलासा देत लॉकडाऊन नव्हे तर राज्यात कडक निर्बंध लागू करणार असल्याची भूमिका जाहिर करत मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भूमिकेपेक्षा …
Read More »
Marathi e-Batmya