राजकारण

पीएम वायफाय म्हणजे एका विशिष्ट कंपनीच्या एकाधिकारशाहीसाठी केंद्राची पावले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी टेलिकॉम सेक्टरमध्ये ज्या कंपन्या आहेत त्यांच्या सर्व्हिसेसमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. ही सगळी व्यवस्था देशात निर्माण होत चालली असून सर्व टेलिकॉम सेक्टरमध्ये एकाधिकारशाही निर्माण करण्याच्यादृष्टीने केंद्रसरकारची पावले पडत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. टेलिफोन बुथसारखी वायफाय सेंटर उघडण्याची …

Read More »

अखेर शालेय शिक्षण मंत्र्यांकडून तो आदेश रद्द; जुनी पेन्शन झाली लागू राज्यातील सर्व १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना दिलासा

मुंबईः प्रतिनिधी जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी १० जुलैची अधिसूचना रद्द करण्याच्या निर्णयावर आज शिक्षक व पदवीधर आमदारांच्या बैठकीत शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी सही केली. १० जुलै २०२० रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील सेवाशर्तीमध्ये बदल सुचवणारी अधिसूचना जारी …

Read More »

राज्य सरकारने दिली शरद पवारांना आगळीवेगळी वाढदिवासाची भेट या योजनेला दिले पवारांचे नाव

मुंबईः प्रतिनिधी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबविण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. १२ डिसेंबर रोजी शरद पवारांचा वाढदिवस असून या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या नावे योजना सुरु करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. कामांतून सामूहिक आणि वैयक्तिक …

Read More »

माजी आदीवासी मंत्री विष्णू सावरा यांचे निधन वयाच्या ७२ व्या वर्षी निधन; भाजपाचा समर्पित कार्यकर्ता हरपला-देवेंद्र फडणवीस

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील भाजपाचा आदीवासी चेहरा असलेले आणि माजी आदीवासी मंत्री विष्णू सवरा यांचे आज संध्याकाळी वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. मागील दोन वर्षापासून त्यांना यकृताचा त्रास होता. त्यांच्यावर पार्थिवावर उद्या सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राजकारणात येण्यापूर्वी ते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीस होते. १९८० साली त्यांनी बँकेतील …

Read More »

खबरदार! महिला व बालकांवर अत्याचार कराल तर थेट फाशीवर लटकाल अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील महिला व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी दिक्षा कायद्याच्या धर्तीवर शक्ती कायदा आगामी अधिवेशनात विधिमंडळात मांडण्यात येणार असून आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. या कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपीला तात्काळ अटक करून १५ दिवसात तपास करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. …

Read More »

दानवेंचा अजब शोध, शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात शेतकरी आंदोलनाबाबत अजब तर्कट

जालना: प्रतिनिधी शेतकरी आंदोलन सुटा बुटातल्या लोकांचे असून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचे आहे. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा धक्कादायक जावई शोध दानवे यांनी लावल्याने त्यांच्या वक्तव्याबाबत आर्श्चय व्यक्त केले. याच देशांनी CAA च्या नावाखाली मुस्लिम समाजाला उचकावले असून भारतातील शेतकऱ्यांनी याचा विचार करण्याचे आवाहन देखील …

Read More »

पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानासाठी जागतिक स्तरावरील सल्लागार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आदेश

मुंबई : प्रतिनिधी औरंगाबादजवळील पैठण येथील संत ज्ञानेश्वर (Sant Dnyaneshwar) उद्यानाचा संपूर्ण कायापालट करून देश-विदेशातील पर्यटकांना तिथे आकर्षित करण्यासाठी लोकांकडून नाविन्यपूर्ण कल्पना तर मागवाच  तसेच जागतिक स्तरावरील  सल्लागार देखील नियुक्त करा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिले. वर्षा येथील समिती सभागृहात यासंदर्भात मंगळवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.जलसंपदा …

Read More »

मनोरा आमदार निवासच्या पुनर्बांधणीबाबत झाला हा निर्णय विधानपरिषद सभापती व विधानसभाध्यक्षांच्या उपस्थितीत उच्चाधिकार समितीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी मनोरा आमदार निवास पुनर्बांधणी एनबीसीसी ऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यास विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या उच्चाधिकार समितीमध्ये मान्यता देण्यात आली. मनोरा आमदार निवास येथे नवीन आमदार निवास इमारत उभारण्यासंदर्भातील कामाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी विधानभवनात बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव …

Read More »

या तीन सनदी अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या सामान्य प्रशासनकडून आदेश जारी

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून अधिकाऱ्यांना तात्काळ आपल्या नवी पदाचा पदभार स्विकारण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांनी दिले. 1. जी श्रीकांत, जिल्हाधिकारी, लातुर यांची बदली व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र बियाणे महामंडळ, अकोला येथे करण्यात आली आहे. 2. पृथ्वीराज बी पी, मुख्य कार्यकारी अधिकारी, …

Read More »

मुंबई समिश्र तर राज्यात भारत बंदला चांगला प्रतिसाद भाजपा वगळता सर्वपक्षियांचा सहभाग

मुंबईः प्रतिनिधी केंद्राच्या शेती कायद्याविरोधात पुकारलेल्या भारत बंदला भाजपातेर सर्व पक्षियांनी संपूर्ण पाठिंबा देत मुंबईसह राज्यातील अनेक भागात आंदोलन करत शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. या बंदला पाठिंबा देण्यासाठी मुंबईसह राज्यातील अनेक रिक्षा संघटनांनी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आपला व्यवसाय बंद ठेवून बंदमध्ये सहभागी होत शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा दिला. विशेषतः …

Read More »