मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पातील लाभार्थ्यांनाच मिळणार अनुदान मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूका येण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक राहीलेला असतानाच पंतप्रधान आवास योजना अर्थात पीएमएवायतंर्गत घर घेणाऱ्या लाभार्थ्यांना आता ३.५० लाख रूपयांचे अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्या अनुषंगाने केंद्राने नुकतेच राज्य सरकारला पत्र पाठविल्याची माहिती नगरविकास विभागातील विश्वसनीय …
Read More »शरद पवारांनी या वयात लोकसभा लढवू नये अन्यथा भाजप पराभव करणार
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा इशारा मुंबई: प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूकीचे पडघड वाजण्यास सुरुवात झाली असून गतवेळी निवडणूक रिंगणातून संन्यास घेतलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा निवडणूक लढविण्यासाठी गळ घालण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शरद पवार साहेबांनी या वयात लोकसभा लढाऊ नये, अन्यथा तो मतदारसंघ भाजपच्या वाटेल आल्यास भाजप त्यांचा …
Read More »४४५ किल्ल्यांच्या संवर्धनासाठी रायगडावर एक दिवसीय दुर्ग परिषद
खासदार छत्रपती संभाजी राजे यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी राज्यात जवळपास ४४५ किल्ले असून यातील फक्त ४५ किल्ले केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या पुरातत्व विभागाकडून आणि राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या पुरातत्व विभागाकडून ३३ किल्ल्यांचे संवर्धन केले जाते. मात्र उर्वरीत ३३२ किल्ल्यांचे संवर्धन करण्याची गरज आहे. या सर्वच किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी येत्या ११ …
Read More »महापौर महाडेश्वर यांच्यासह २१ अपात्र ठरलेल्या नगरसेवकांवर मेहेरनजर
मुंबई महापालिकेकडून अपात्र नगरसेवकांवर गुन्हे दाखल नाही मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगरपालिका निवडणूकीत खोटी जात प्रमाणपत्रे सादर करत निवडूण आलेल्या महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह २१ नगरसेवकांना अपात्र ठरविले. परंतु या अपात्र नगरसेवकांवर मुंबई महापालिकेने खास मेहेरनजर दाखवित यांच्यावर गुन्हाच दाखल करण्यात आलेला नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. तसेच गुन्हा नोंदविण्याबाबत …
Read More »मंत्रालयातील तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा सरकारच्या विरोधात हल्ला बोल
लिपिकांना केंद्राच्या धर्तीवर पगार द्या मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या तृतीय श्रेणीतील लिपिक-टंकलेखक कर्मचाऱ्यांना केंद्राच्या वेतन पध्दतीप्रमाणे वेतन मिळावे यामागणीसाठी मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांनी आरसा गेट समोर सरकारच्या विरोधात हल्ला बोल केला. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत अचानक लिपिक आणि टंकलेखकांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. आंदोलकांच्या घोषणांनी मंत्रालय परिसर दणाणून …
Read More »अण्णा हजारे म्हणतात, जिल्हाधिकारी-तहसीलदारांनो जनतेची निवेदने उठून स्विकारा
लोकशाही टिकविण्यासाठी प्रशासनाने विचार करण्याचे आवाहन अहमदनगर : प्रतिनिधी इंग्रज गेल्यानंतर देशात लोकशाही रचना स्विकारण्यात आली. या लोकशाहीत जनता मालक झाली आहे. परंतु इंग्रजांच्या काळात असलेली प्रोटोकॉलची पध्दत देशातील सर्वच अधिकाऱ्यांकडून पाळली जात असल्याने मालक असलेल्या जनतेचा अवमान होत आहे. त्यामुळे तहसीलदार, आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व अधिकारी जनतेचे सेवक आहेत. …
Read More »विधीमंडळाचे लेखानुदान अधिवेशन एक दिवसाने वाढविले
विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांच्या मागणीला यश मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभेच्या निवडणूकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात लागण्याची शक्यता गृहीत धरून राज्य सरकारकडून यंदाचे लेखानुदान विधिमंडळात सादर करण्यासाठी अवघ्या चार दिवसाचे अधिवेशन बोलावले. परंतु राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने त्यावर सरकारकडून करण्यात येत असलेल्या कामाची माहिती करून घेता यावी याकरिता लेखानुदान …
Read More »डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर भव्य तिरंगा व अखंड भीमज्योत उभारणार
सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी कुपरेज-ओव्हल मैदान (कुलाबा) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भव्य राष्ट्रीय तिरंगा ध्वज व अखंड भीमज्योत उभारणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. कुपरेज-ओव्हल मैदान (कुलाबा) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भव्य …
Read More »मोदी, नितीशकुमारांच्या विजयाचे शिल्पकार प्रशांत किशोर उध्दव ठाकरेंच्या भेटीला
नव्या राजकिय चर्चांना उधाण मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पार्टीचे सदस्य असलेल्या आणि जनता दल (संयुक्त)ला विजय मिळवून देणारे प्रशांत किशोर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची आज मंगळवारी वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकिय पटलावर विविध चर्चांना …
Read More »राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या ब्राम्हणांसह उच्चवर्णियांना आरक्षण
केंद्राच्या धर्तीवर राज्यातही १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ब्राम्हण, मराठा यासह उच्चवर्णिय समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना केंद्राप्रमाणे राज्य सरकारमधील शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये १० टक्के आरक्षण मंजूर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रूपयांच्या मर्यादेत आहे, त्यांना या …
Read More »
Marathi e-Batmya