शरद पवारांनी या वयात लोकसभा लढवू नये अन्यथा भाजप पराभव करणार

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा इशारा 

मुंबई: प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणूकीचे पडघड वाजण्यास सुरुवात झाली असून गतवेळी निवडणूक रिंगणातून संन्यास घेतलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा निवडणूक लढविण्यासाठी गळ घालण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शरद पवार साहेबांनी या वयात लोकसभा लढाऊ नये, अन्यथा तो मतदारसंघ भाजपच्या वाटेल आल्यास भाजप त्यांचा पराभव करेल असा इशारा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. 

पाटील म्हणाले की, पवार साहेब छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यांचा विचार करतात, एक लोकसभा म्हणजे जवळ जवळ ६०० गावे मतदारसंघात येतात. एवढ्या मोठ्या परिसरात पवार साहेब फिरणे अवघड आहे. त्यामुळे त्यांनी लोकसभा न लढवलेलीच बरी. पण त्यांनी लोकसभा लढवलीच तर त्यांचा भाजप पराभव करेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यातल्या अनेक भागांचा आढावा घेण्यात आला असून पाणी टंचाई असणाऱ्या गावात टँकर्स सुरु केले आहेत. ग्रामीण भागातील महिलांची गैरसोय टाळण्यासाठी टंचाईग्रस्त एक हजार गावांमध्ये पाणी साठवण्यासाठी टाक्या बसविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उस्मानाबाद, जालना, बीड, परभणी, अहमदनगर व औरंगाबाद या सहा जिल्ह्यात ८ गोशाळांच्या माध्यमातून चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये आतापर्यंत ७ हजार ३५७ जनावरे दाखल झाली आहेत. आवश्यकता असेल त्या ठिकाणी अर्जांची छाननी करून तत्काळ चारा छावण्या सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच मंडळस्तरावर जनावरांची संख्या वाढल्यास व संस्था अथवा व्यक्तींनी चारा छावणी सुरू करण्याची तयारी दर्शविल्यास एकापेक्षा अधिक चारा छावण्या सुरू करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *