राजकारण

हुकुमशाही सरकारविरोधात काँग्रेस सेवादलाची तिंरगा पदयात्रा ९ मार्च रोजी रोजी निघणार

मुंबईः प्रतिनिधी केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार हुकुमशाही पद्धतीने कारभार करत आहे. संविधानिक संस्थांची गळचेपी सुरु असून देशाचे संविधान आणि लोकशाही धोक्यात आली आहे. संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी शनिवारी ९ मार्च रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे यांच्या नेतृत्वाखाली टिळक भवन दादर येथून तिरंगा पदयात्रा काढण्यात येणार आहे. …

Read More »

मोदींच्या कृपेने देशाची अर्थव्यवस्था संकटात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी मोदीसाहेबांच्या कृपेने देशाची अर्थव्यवस्था संकटात आली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला. देशावर ८४ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर मोदी सरकारने उभा केला आहे. आणि देशातील सव्वाशे कोटी जनतेच्या डोक्यावर ६५ हजाराचे कर्ज करुन ठेवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. नोटाबंदी, जीएसटी चुकीच्या अंमलबजावणीमुळे …

Read More »

उद्योग विभागाचे सचिव सतीश गवई यांना ७ कोटींची लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्याची नवाब मलिक यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याला ९० लाख खर्च होतात आणि ५ अधिकारी दौऱ्यावर जातात त्यावेळी ७ कोटी ६३ लाख रुपये खर्च होतात आणि हा खर्च एमआयडीसीच्या खात्यातून खर्च केला गेला. एकप्रकारे बिल्डरांच्या घशात जागा घालण्यासाठी हे सगळे केले जात असून राज्याच्या उद्योग विभागाचे अतिरिक्त सचिव सतीश गवई यांना ७ कोटीची …

Read More »

माथाडी कामगारांची कर्जवसूलीच्या नावाखाली होणारी लूट थांबणार परस्पर होणाऱ्या पगार कपातीला कामगार विभागाकडून फुलस्टॉप

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील माथाडी कामगारांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत त्यांच्या पगारीतून वारेमाप पध्दतीने कर्जवसूली करणाऱ्या पतसंस्था, पतपेढ्या, खाजगी बँकांच्या वसुलीला आता कामगार मंडळाने चाप लावण्याचा निर्णय घेतला. तसेच या अनुषंगाने कामगार विभागाने नुकताच शासन निर्णयही प्रसिध्द केला. राज्याच्या विविध भागात जवळपास २ लाख ५ हजार माथाडी कामगारांची नोंद आहे. त्यापैकी १ …

Read More »

सफाई कामगारांना असंघटित क्षेत्रातील कामगारांचे लाभ द्या सफाई कामगारांच्या पाल्यांना स्पर्धा परीक्षांसाठी ‘बार्टीने प्रशिक्षण देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

नागपूर : प्रतिनिधी सर्व क्षेत्रातील सफाई कामगारांना असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या श्रेणीत समाविष्ट करुन त्यांना सर्व योजनांचा लाभ देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार सुधाकर कोहळे, प्रा. अनिल सोले, सुधाकर देशमुख, …

Read More »

राफेल प्रकरणी बुडत्या मोदी सरकारचा पाय अधिक खोलात काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयात राफेल संबंधित पुनर्विचार याचिकेवर सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी याचिकाकर्ते प्रशांत भूषण यांच्यावर संरक्षण खात्यातील गुप्त कागदपत्रे चोरल्याचा आरोप करून त्या कागदपत्रांचा विचार करू नये अशी विनंती न्यायालयाला केली. प्रत्यक्षात ही कागदपत्रे माहिती अधिकारातून उपलब्ध झाली आहेत असे प्रशांत भूषण यांनी …

Read More »

अधिकाऱ्यांकडून फायलींचा निपटारा करण्याच्या कामाला गती निवडणूकीची आचारसंहिता ८ मार्चला लागू होण्याची शक्यता

मुंबईः प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता ८ मार्च रोजी लागण्याची शक्यता गृहीत धरून राज्य कारभाराचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात फायलींच्या निपटाऱ्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. यामध्ये विशेषत वित्त विभाग, नगरविकास विभाग, गृहनिर्माण विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर धावपळ सुरु असल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे. निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यातील विकास कामांच्या अनुषगांने …

Read More »

भाजप-शिवसेनेला मतदान न करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा - मराठा क्रांती ठोक मोर्चाची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी उद्धव ठाकरे यांनी आझाद मैदानात येऊन आम्हाला अनेक आश्वासन दिली होती. मात्र त्यांनी मातोश्रीवर गेलेल्या शिष्टमंडळाचा अपमान केल्याचे सांगत आरोप करत उध्दव ठाकरे यांनी समाजाची फसवणूक केल्याचा आरोप सरकारनेही आऱक्षण देण्याचे जाहीर करून अद्याप आरक्षण लागू केले नसल्याने भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांना गावबंदी करून त्यांच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन करणार …

Read More »

राफेल कराराची कागदपत्रे चोरीला केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती

नवी दिल्लीः प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राफेल विमान खरेदीतील घोटाळ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर टीकेची झोड उठविण्यात आली. त्यातच या घोटाळ्याप्रकरणी खोटी कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयात सादर करून न्यायालयाची दिसाभूल केल्याप्रकरणाचे वादळ शांत होत नाही तोच राफेल विमान कराराची कागदपत्रे चोरीला गेल्याची माहिती केंद्र सरकारचे महाधिवक्ता के.के. वेणूगोपाळ यांनी आज मंगळवारी …

Read More »

राज्यातील प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू २०१६ पासून लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी उच्च शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या विविध शिक्षण संस्थांमधील शिक्षक व शिक्षक समकक्ष संवर्गांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित शैक्षणिक अर्हता लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्यातील अकृषि विद्यापीठे, विधि विद्यापीठे व संलग्नित अशासकीय अनुदानित महाविद्यालये, शासकीय महाविद्यालये, …

Read More »