भाजप-शिवसेनेला मतदान न करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा - मराठा क्रांती ठोक मोर्चाची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी
उद्धव ठाकरे यांनी आझाद मैदानात येऊन आम्हाला अनेक आश्वासन दिली होती. मात्र त्यांनी मातोश्रीवर गेलेल्या शिष्टमंडळाचा अपमान केल्याचे सांगत आरोप करत उध्दव ठाकरे यांनी समाजाची फसवणूक केल्याचा आरोप सरकारनेही आऱक्षण देण्याचे जाहीर करून अद्याप आरक्षण लागू केले नसल्याने भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांना गावबंदी करून त्यांच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन करणार असल्याची घोषणा मराठा क्रांती मोर्चा-मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक संजय जाधव यांनी केली.
मराठा आरक्षणासंदर्भात पुढील वाटचाल निश्चित करण्यासाठी नरिमन पॉंईट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत समन्वयक अण्णासाहेब जावले-पाटील, नानासाहेब जावळे-पाटील आदी उपस्थित होते.
आरक्षणाच्या मागणीवरून जी काही जाळपोळ झाली ती सर्व जाळपोळ ही सरकार पुरस्कृत होती असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
मराठा समाजाला नोकऱ्यांमध्ये सामावून घेऊ नका असा जीआर काढला त्यांना उद्धव यांनी विरोध का केला नाही…? उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाबद्दल अपशब्द काढले त्याचाही आम्ही निषेध करत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
सरकारने मराठा समाजाला १६% आरक्षण जाहीर केलं पण ते अजून लागू नाही. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची घोषणाही सरकारने केली होती. मात्र अद्याप पर्यंत गुन्हे मागे घेतले नाहीत. मराठा आंदोलनात ज्यांनी बलिदान दिले, त्यांच्या वारसांना नोकरी देऊ अस जाहीर केलं होतं पण ते ही मिळालं नाही. त्यामुळे येत्या 2 दिवसात मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा अन्यथा येत्या निवडणुकीत भाजप- शिवसेनेवर बहिष्कार घालण्याचा इशारा समन्वयक अण्णासाहेब जावळे-पाटील यांनी दिला.
शिवसेना भवन मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोच्या वर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावलाय त्याचा ही आम्ही निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ फक्त नवा पुरत, त्याचा मराठा तरुणांना काहीही फायदा होत नाही आहे. हे महामंडळ बरखास्त करावं अशी मागणी समन्वयक नानासाहेब जावळे-पाटील यांनी केली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या मार्गावर चालणे हाच विकासाचा खरा मार्ग किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा

छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *