पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अखेर देश संकटात आहे हे कबुल करून स्वतःचे अपयश मान्य केले आहे. १२ वर्षांपासून नरेंद्र मोदींनी देशाला वेठीस धरले आहे. निवडणुका, प्रचार व द्वेष पसरण्यापलिकडे भाजपा व मोदी सरकारने काहीही केलेले नाही. अमेरिका-इराण युद्धाचा फटका देशाला बसणार हे माहित असतानाही मोदी सरकारने कोणतेही नियोजन केले नाही, त्याचा मोठा फटका …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, ‘त्याग’ करण्याच्या उपदेशापेक्षा नरेंद्र मोदींनीच राष्ट्रहितासाठी ‘त्याग’ करावे देशावरील संकट हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नाकर्तेपणा व बेफिकीरवृत्तीचा परिपाक, देश चालवण्यात ‘कॉम्प्रमाइज्ड पंतप्रधान’ सपशेल फेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला पेट्रोल-डिझेल, सोने खरेदी, खतांचा वापर व खाद्यतेलाच्या वापरावर केलेला उपदेश म्हणजे देश चालवण्यास ‘कॉम्प्रमाइज्ड पंतप्रधान’ सपशेल फेल ठरल्याचे द्योतक आहे. जनतेला त्याग करण्याचा नाहक सल्ला व उपदेश दणारे मोदी व त्यांचे सहकारी मात्र कोट्यवधी रुपयांची उधळण करत आहेत. सगळा त्याग जनतेने करायचा आणि नरेंद्र मोदी फक्त …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्या सूचनेच्या अंमलबजावणीसाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन मुख्य सचिव राकेश अगरवाल यांच्या नेतृत्वाखाली बैठक, नंतर मुख्यमंत्री फडणवीस हे ही घेणार बैठक
मध्यपूर्वेतील तणावग्रस्त आणि युद्धग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर व कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १०० डॉलर पर्यंत गेल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार असल्याने इंधन खरेदी करू नका, परदेशी विमान प्रवास करू नका, किमान वर्षभर सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या आणि मालकीच्या, भाडे …
Read More »जयंत पाटील यांचा आरोप, महाराष्ट्र भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्या मध्ये पहिला तर महिला अत्याचार मध्ये देशात दुसरा देशात १७ राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे
नुकताच एनसीआरबीचा अहवाल प्रसिद्ध झाला. या अहवालातील आकडेवारी महाराष्ट्रासाठी काही अनुकूल नाही. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सरकारला धारेवर धरले आहे. देशात १७ राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे पण महाराष्ट्र भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्या मध्ये पहिला तर महिला अत्याचार मध्ये देशात दुसरा! अरे, कुठे …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचे मत, भाजपविरोधी आघाडीची गरज; मुस्लिम समाजाने पुढाकार घ्यावा मुसलमानों का सियासी अजेंडा पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन!
देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत भाजप आणि आरएसएसविरोधात प्रभावी पर्याय उभा करायचा असेल, तर मुस्लिम समाजाने पुढाकार घेऊन काँग्रेस पक्षाला इतर धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत युती करण्यास भाग पाडले पाहिजे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. मुंबईत आयोजित नफरत और खौफ़ के दौर में मुसलमानों का …
Read More »शिवसेना खासदार डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा दोन महिन्यांचा राज्यव्यापी दौरा राज्यातील २२ जिल्हे, १०० हून अधिक विधानसभा मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संघटना अधिक मजबूत, सक्षम आणि बूथस्तरापर्यंत प्रभावी करण्यासाठी शिवसेना संसदीय गटनेते तथा कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा विधानसभा निहाय कार्यकर्ता, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी संवाद दौरा १६ मे २०२६ पासून सुरू होत आहे. १६ मे ते १५ जुलै असे …
Read More »प्रताप सरनाईक यांची स्पष्टोक्ती, व्यावसायिक वाहन चालकांनी व्यवहारिक मराठी शिकणे ही काळाची गरज अमराठी ड्रायव्हरंना मराठी भाषा शिकविण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन
महाराष्ट्रात व्यवसायिक प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक चालकाला व्यवहारिक मराठी येणे अत्यावश्यक आहे. मराठी शिकणे म्हणजे कोणावर बंधन घालणे नव्हे, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि अस्मितेचा आदर करणे आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. रंगशारदा मंदिर येथे आयोजित हिंदी भाषिकांच्या नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या “वर्धापन दिन व जल्लोष मेळावा” …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, राज्य सरकार जाणार सर्वोच्च न्यायालयात मीरा-भाईंदरमधील २५४ एकर जमीन राज्य सरकारची
राज्य शासनाच्या मालकीची मीरा-भाईंदर येथील कोट्यवधी रुपये किंमतीची सुमारे २५४.८८ एकर जमीन दोन बिल्डरला देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध राज्य सरकारने कंबर कसली असून, या निकालाला सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिकेतून आव्हान देण्यात येणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयाने ३० एप्रिल २०२६ ही जमीन दीइस्टेट …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, विकास लवांडे यांच्यावरील शाईहल्ला वारकरी संप्रदायाचा अपमान नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, आधी एफआयआर सार्वजिनक करा
राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावरील शाईहल्ला, धक्काबुक्की व शिवीगाळ हा भ्याड हल्ला असून हल्लेखोर वारकरी संप्रदायाच्या विचाराला माननारे नाहीत. या प्रकरणाला भाजपाची चिथावणी असून अशा हल्लेखोरांना भाजपा सरकार संरक्षण देत आले आहे. विकास लवांडे यांच्यावरील हल्ला हा वारकरी संप्रदायाचा अपमान आहे, या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी …
Read More »“मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने”अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची संधी १५ मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” अंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी बिहार राज्यातील बोधगया येथे तीर्थदर्शन यात्रा आयोजित करण्यात येत आहे. या यात्रेसाठी इच्छुक व पात्र ज्येष्ठ नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले असून दि. १५ मे २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगर सहाय्यक आयुक्त रविकिरण पाटील …
Read More »
Marathi e-Batmya