राजकारण

आमदार रईस शेख यांची माहिती, मुख्य सचिवांचे पोलिसांना आदेश, वाहने अडवणाऱ्यावर कारवाई करा आमदार रईस शेख, अबू आझमी, अस्लम शेख, सना मलिक यांची बैठकीला उपस्थिती

२८ मे रोजी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या वाहतूक करणाऱ्या वाहने अडवणाऱ्या स्थानिक गुंडांवर कठोर कायदेशीर करण्यात यावी. तसेच प्रमाणापेक्षा जास्त जनावरांची वाहतूक केल्याबद्दल जनावरांच्या व्यापाऱ्यावर कारवाई करणे बेकायदा आहे, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी पोलीसांना दिल्या आहेत, अशी माहिती समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, ओबीसी समाजाच्या विकासासाठी केंद्र-राज्य योजनांची अंमलबजावणी करा ओबीसी समाजाचा विकास राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया

ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या समन्वयातून विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. ओबीसींसाठी विविध योजनांची अंमलबजावणी गुणवत्तापूर्ण आणि परिणामकारक करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.ओबीसी समाजाचा विकास हा राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. इतर मागासवर्ग कल्याण संसदीय समितीने हॉटेल ट्रायडेंट …

Read More »

काँग्रेसने मर्जी दाखवलेल्या खाजगी अभिमत विद्यापीठावर आता भाजपाचीही मर्जी ॲमिटी विद्यापीठाच्या विस्तारासाठी रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशनला १५ एकर जमीन

काही वर्षापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात राज्यात खाजगी विद्यापीठांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी ॲमिटी विद्यापीठालाही अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी काँग्रेसकडून अधिवेशन संपण्याच्या एक-दोन दिवस आधी संध्याकाळी विधानसभा आणि विधान परिषदेत त्याविषयीचे विधेयक मंजूर करण्यात आले. तसेच त्यानंतर काही वेळातच ॲमिटी विद्यापीठाला खाजगी अभिमत विद्यापीठाचा …

Read More »

राज्यातील १५ जिल्ह्यांतील ६३३ गावे, १६५२ वाड्यांमध्ये ७०६ टँकरद्वारे पाणीपुरवठा राज्य सरकारच्या पाणी पुरवठा विभागाची माहिती

राज्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्याअसून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी शासनाने विविध जिल्ह्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवला आहे. ११ मे ते १७ मे २०२६ दरम्यानच्या कालावधीतील अहवालनुसार राज्यातील १५ जिल्ह्यांतील ६३३ गावे आणि १६५२ वाड्यांमध्ये एकूण ७०६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या टँकरमध्ये ३३ …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, ई-चलन संदर्भातील मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेऊ वाहतूकदारांना न्याय देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करणार

कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत भेट घेऊन ई-चलन प्रणाली, वेगमर्यादा नियम, एएनपीआर कॅमेरे तसेच दंड आकारणी संदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वाहतूकदारांच्या मागण्यांबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, माजी आमदार …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, देशाला ‘संपन्न ऊर्जा’ राष्ट्र बनविण्यासाठी महाराष्ट्राचे बळ मिळणार राज्य शासनाचा अणुऊर्जा निर्मितीसाठी कंपन्यांशी सामंजस्य करार, २५, ४०० मेगावॅट अणुऊर्जा व १,२३,५०० रोजगार निर्मिती, एकूण गुंतवणूक ६,५०,००० कोटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवून देशात शून्य कार्बन उत्सर्जन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तीसाठी महाराष्ट्र पुरेपूर प्रयत्न करीत आहे. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक ही देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. …

Read More »

सचिन सावंत यांचा आरोप, नीट (NEET) घोटाळ्याप्रमाणे MH–CET मध्येही मोठा घोटाळा दहावी बारावीला अत्यंत कमी मार्क्स असलेल्यांना CET मध्ये १०० पर्सेंटाईल्स कसे?

देशभरात नीट (NEET) पेपरफुटीने विद्यार्थी व पालकांची चिंता वाढली असून आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर जर तरुणपिढीला फसवले जात असेल तर ही देशाची सुद्धा फसवणूकच आहे. नीट NEET पेपरफुटीची चौकशी सुरु असली तरी अशा चौकशातून पुढे काहीही निष्पन्न होत नाही. नीट सारखाचा गडबड घोटाळा MH – CET परिक्षेतही झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. दहावी बारावीला जेमतेम ३५-४० टक्के …

Read More »

विधान परिषदेच्या १६ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर १८ जून २०२६ रोजी मतदान तर २२ जून २०२६ रोजी मतमोजणी

महाराष्ट्र विधान परिषदेतील १६ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने या जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये निवडणूक आचारसंहिता तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, उस्मानाबाद-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि औरंगाबाद-जालना या १६ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील सदस्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे या निवडणुका घेण्यात येणार आहेत. निवडणूक …

Read More »

नीट पेपरफुटी प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसची मुंबई मेट्रोमध्ये प्रवाशांशी संवाद साधत जनजागृती मोहीम भाजपा सरकारच्या संरक्षणाखालीच पेपरफुटीचे रॅकेट फोफावल्याचा आरोप

मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबई मेट्रोमधून प्रवास करत नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाविरोधात व्यापक जनजागृती मोहीम राबवली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या पेपरफुटी रॅकेटविरोधात संताप व्यक्त करत भाजप सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांपर्यंत पोहोचत युवक …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, तीर्थक्षेत्र विकासकामे दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत पूर्ण करा महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटींच्या कामांना मान्यता

राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या जतन व संवर्धनास शासनाचे प्राधान्य असून तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी.  तसेच भाविक-पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधासह आरोग्यसुविधाची उपलब्धता करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी दिले. यावेळी शिखर समितीच्या बैठकीत सहा तीर्थक्षेत्र विकासासाठी एकूण ९९३.७२ कोटी रुपयांच्या  विकास आराखड्यांना आणि निधीला मंजुरी देण्यात आली. सह्याद्री …

Read More »