‘तृतीयपंथी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) सुधारणा विधेयक, २०२६’ ला काँग्रेस पक्षाचा तीव्र आणि ठाम विरोध आहे. हा केवळ एका विधेयकाला विरोध नाही तर सरकारच्या विचारसरणीलाच विरोध आहे. स्वातंत्र्य आणि सन्मान सरकारने दिलेल्या देणग्या नाहीत तर जन्मजात आणि मूलभूत हक्क आहे पण सरकार देशाच्या नागरिकांना हानी पोहोचवणाऱ्या प्रत्येक प्राधिकरणाला आपल्या पायाखाली तुडवू इच्छित आहे. ‘तृतीयपंथी …
Read More »आशिष शेलार यांची माहिती, मुंबईत मराठीसाठी लवकरच स्वतंत्र चित्रनाट्यगृह उभारणार १६४ मराठी चित्रपटांना २४ कोटी १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य
दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेच्या अंतर्गत ऑक्टोबर २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत परीक्षण केलेल्या ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ श्रेणीतील ६५ चित्रपट आणि कोविड काळातील ९८ चित्रपटांना एकूण २४ कोटी १० लाख अर्थसहाय्य मंगळवारी वितरित करण्यात आले. त्यावेळी मुंबईत केवळ मराठीसाठी स्वतंत्र चित्रनाट्यगृह लवकरच उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे …
Read More »उदय सामंत यांची माहिती, गट ड मधून पदोन्नती संदर्भात तीन वर्षांची अट करण्याबाबत शासन सकारात्मक ठाणे महानगरालिकेसंदर्भातील चर्चे दरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती
ठाणे महानगरपालिकेत गट ‘ड’ मधील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी असलेली पाच वर्षांची अट तीन वर्षांवर आणण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधान परिषदेत अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना सांगितले. सदस्य ॲड. निरंजन डावखरे यांनी नियम ९७ अन्वये या विषयी विधान परिषदेत अल्पकालीन चर्चा उपस्थितीत केली होती. ठाणे महापालिकेमध्ये गट ‘ड’ च्या कर्मचाऱ्यांच्या …
Read More »अतुल सावे यांची माहिती, दिव्यांग कल्याण विभागाची जिल्हास्तरावरील यंत्रणा सक्षम करणार दिव्यांग कल्याण विभागाशी संबधित प्रश्नावर विधानसभेत उत्तर देताना दिली माहिती
राज्यातील दिव्यांग कल्याण विभागाशी संबंधित वेतन आणि अनुदान प्रक्रियेत गैरव्यवहार होवू नये यासाठी शासनाने सखोल तपासणी सुरू केली असून, ज्या संस्थांची कागदपत्रे व प्रक्रिया स्पष्ट आहेत, त्यांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. राज्यात जिल्हास्तरावर दिव्यांग कल्याण विभाग अधिक सक्षम करण्यासाठी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अधिकाऱ्यांची भरती केली जाणार असल्याची …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, भोंदूबाबाची माहिती दिवाळीमध्येच मुख्यमंत्र्यांकडे होती; तर सहा महिने झोपा काढल्या काय? मंत्री पोलिसांकडून मार खातात हे अत्यंत गंभीर; साताऱ्यातील प्रकरणाने वोटचोरीवर पुन्हा शिक्कामोर्तब
दिवाळीच्या आसपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची माहिती मिळाली होती. ऑक्टोबर, नोव्हेंबरपासूनच खरातचे गैरव्यवहार चव्हाट्यावर आले, गृहविभाग पुरावेही गोळा करत होते, मग मुख्यमंत्री सहा महिने झोपा काढत होते का?, असा संतप्त सवाल उपस्थित करून खरात प्रकरणाने जी विकृत चर्चा सुरु आहे ती महाराष्ट्रासाठी चांगली नाही. एसआयटीला अधिकची कुमक द्या, टास्क फोर्स लावा आणि …
Read More »दादाजी भुसे यांची माहिती, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा व अनुदानित शाळांचे ऑडिट करणार अधिक निधीसाठी शासन प्रयत्नशील
भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या शाळांची अवस्था लक्षात घेऊन सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा व अनुदानित शाळांचे ऑडिट करण्यात येणार आहे. शिक्षणासाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली. सदस्य रईस शेख यांनी भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या शाळांच्या दुरवस्थेबाबत लक्षवेधी सूचना मांडली. शालेय शिक्षण मंत्री …
Read More »आशिष शेलार यांची माहिती, टास्क फोर्सच्या अहवालानंतर सोशल मीडिया नियंत्रणाबाबत धोरण ठरणार लहान मुलांच्या संदर्भात तयार करणार ठोस धोरण
राज्यातील अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरावर नियंत्रण आणण्याबाबत शासनाने नेमलेल्या टास्क फोर्सच्या अहवालानंतरच ठोस धोरण किंवा कायदा तयार केला जाईल, अशी माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत सदस्य राजेश पवार यांनी सोशल मीडिया, ऑनलाइन गेम्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या वाढत्या वापरामुळे अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या परिणामांबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती. …
Read More »महाराष्ट्र लोक भवन येथे बिहार राज्य स्थापना दिवस साजरा बिहार ही संसदीय परंपरांची जन्मभूमी : राज्यपाल जिष्णु देव वर्मा
महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र लोकभवन येथे ‘बिहार राज्य स्थापना दिवस’ साजरा करण्यात आला. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून महाराष्ट्र लोकभवनातर्फे बिहार राज्य स्थापना दिनाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला. बिहार ही संस्कृती, अध्यात्म व तत्वज्ञानाची भूमी आहे. या भूमीने देशाला भगवान महावीर …
Read More »सातारा प्रकरणी उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा तो निर्णय सभापती शिंदे यांनी रोखून धरला पोलिस अधिक्षक तुषार दोषी यांच्या निलंबनाची कारवाईबाबता निर्णय
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाने शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी युतीचे संख्याबळ असूनही आपला अध्यक्ष बनवून चांगलाच दणका दिला असताना आता अधिवेशनातही भाजपाने शिंदे गटाला अक्षरश: धोबीपछाड दिला आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन्ही गटांत राडा, वादावादी आणि चक्क शिंदे गटाच्या मंत्र्यांना धक्काबुक्की झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज विधान …
Read More »नरहरी झिरवाळ यांची माहिती, अन्नपदार्थामध्ये भेसळ करणाऱ्यांविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई विधान परिषदेत एका प्रश्नाला दिली माहिती
राज्यातील अन्नसुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी तपासणी मोहिमा अधिक व्यापक करण्यात येतील. अन्न पदार्थामध्ये भेसळ करणाऱ्यांविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. सदस्य डॉ. मनिषा कायंदे यांनी याविषयी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य भाई जगताप, ॲड. …
Read More »
Marathi e-Batmya