राजकारण

काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत झाले “हे” निर्णय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारीत कार्यकारिणीची बैठक संपन्न

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या उदयपूर येथे झालेल्या नवसंकल्प शिबिराच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दोन दिवसांचे राज्यस्तरीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. १ व २ जून रोजी शिर्डी येथे हे शिबीर होत आहे, या शिबिराला राज्यातील मंत्री, सर्व जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित असतील. उदयपूरच्या नवसंकल्प शिबिरातील सर्व मुद्दे राज्यातील शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवले …

Read More »

जेजुरी विकासाच्या निमित्ताने गडावर या सोयी-सुविधा निर्माण होणार ऐतिहासिक वास्तूंचे जतन करताना पुरातत्त्वीय शैली जपावी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील १०९.५७ कोटींच्या पहिल्या टप्प्याच्या कामास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करताना त्या वास्तूची मूळ शैली जपणे आवश्यक असून पुरातत्त्वीय जाण असलेल्या संस्थेमार्फत ही कामे करण्यात यावीत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव …

Read More »

संजय राऊत म्हणाले; कोणीही असो, आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही शिवसेनेचा उमेदवार देऊन निवडूण आणू

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजी राजे यांना शिवसेनेत आल्यानंतर उमेदवारी जाहिर करण्याची अट शिवसेनेकडून घालण्यात आली. मात्र त्याऐवजी संभाजी राजे यांनी शिवसेनेऐवजी आपणास महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून जाहिर करा अशी अट घातली. तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निमंत्रणानंतरही त्यांनी वर्षा बंगल्यावर जाण्याऐवजी कोल्हापूरला जाणे पसंत केले. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत …

Read More »

शिवसेना आमदार भास्कर जाधव म्हणाले, राज यांनी भाजपाची नखे ओळखली हिणवण्याऐवजी त्याकडे राजकीय प्रगल्भतेनं पाहिलं पाहिजे

अयोध्येच्या दौऱ्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारच्या सभेत घेतलेल्या भूमिकेवरून एकाबाजूला सर्वच स्तरातून हिणवण्याचा प्रकार सुरू झालेला असतानाच शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी मात्र राज ठाकरे यांच्या भाषणाचे आणि भूमिकेचे कौतुक केले. त्याचबरोबर राज ठाकरेंच्या भाषणाकडे राजकिय प्रगल्भतेने पाहिले पाहिजे असा सल्ला जाधव यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिला. …

Read More »

मविआ सरकारच्या त्या निर्णयावर फडणवीस म्हणाले, हि तर शुध्द फसवणूक त्या निर्णयाचा जी आर कुठाय केला सवाल

वाढत्या महागाईला रोखण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील अबकारी करात कपात केल्यानंतर राज्य सरकारनेही आपल्या करात कपात करत असल्याचा निर्णय घेत त्या अनुषंगाने काही यासंदर्भात एक प्रसिध्दी पत्रकही काढले. मात्र राज्य सरकारच्या त्या प्रसिध्दी पत्रकावरून विरोधई पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत महाविकास आघाडीकडून हि तर शुध्द फसवणूक करण्यात आल्याचा …

Read More »

दारूप्रमाणेच पेट्रोल-डिझेलवरील कर ५० टक्क्याने कपात करा भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी

जनतेच्या खिशातून हजारो कोटींची लूट केल्यानंतर आता पेट्रोल, डिझेलवरील मूल्यवर्धित करामध्ये अनुक्रमे २.०८ रुपये व १.४४ रुपये कपातीचा केवळ कागदी गाजावाजा करून ठाकरे सरकारने पुन्हा एकदा जनतेच्या डोळ्यात धुळ फेकली आहे. महागाईने त्रासलेल्या जनतेस दिलासा देण्यासाठी ठाकरे सरकारने दारूप्रमाणे पेट्रोल – डिझेल वरील करातही तातडीने ५० टक्के कपात करून जनतेला …

Read More »

हनुमान चालिसा सोडून पेट्रोल – डिझेलवर बोलतायत हे ही नसे थोडके गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा फडणवीसांना टोला

हनुमान चालिसा सोडून पेट्रोल – डिझेलवर बोलतायत हे नसे थोडके असा टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. राज्य सरकारने पेट्रोल- डिझेलवरील मुल्यवर्धीत करात कपात केल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत टिका केली. यावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस हे …

Read More »

संभाजी छत्रपतींनी शिवसेनेकडे पाठ फिरविल्यानंतर “या” दोन नावांची चर्चा उर्मिला मातोंडकर किंवा चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून लढत देणाऱ्या संभाजी राजे यांना रितसर पक्षात प्रवेश घेऊन निवडणूक लढविण्याचा पर्याय शिवनेने दिलेला असतानाही शिवसेनेच्या ऑफरकडे पाठ फिरविली. त्यानंतर शिवसेनेकडून दोन नावांची चर्चा सुरु झाली आहे. त्यातील शिवसेनेची ऑफर न स्वीकारल्यास अभिनेत्री उर्मिला मातोंडकर किंवा औरंगाबदचे कट्टर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यापैकी एकाला …

Read More »

मुख्यमंत्र्यांचा संभाजी राजेंना निरोप, पण राजे आपल्याच मागणीवर ठाम हॉटेल ट्रायडंट मध्ये शिवसेना नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर उद्याची प्रतिक्षा

राज्यसभेची निवडणूक जाहिर झाली. मात्र या निवडणूकीत महाराष्ट्रातून सहाव्या जागेसाठी माजी खासदार संभाजी राजे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. मात्र शिवसेनेकडून त्यांना पक्षात प्रवेश केल्यानंतरच उमेदवारीबाबत विचार करण्याचे आश्वासन दिले. यापार्श्वभूमीवर संभाजी राजे यांना उद्या वर्षा बंगल्यावर शिवबंधन बांधून घेण्यासाठी या असा निरोप मुख्यमंत्री उध्दव ठाकरे …

Read More »

काँग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले, अयोध्या द ट्रॅप चित्रपटाचा रचेता दुसरं-तिसरं कोणी… मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या आरोपावर सचिन सावंतकडून दावा

उत्तर प्रदेशातून वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा तुर्तास स्थगित केल्याचे जाहिर करत याप्रश्नी सविस्तर बोलण्यासाठी पुण्यात आज जाहिर सभा घेतली. त्यावेळी अयोध्येत माझ्या विरोधात ट्रॅप लावण्यात आल्याचा खळबळजनक आरोप केला. या आरोपाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या द ट्रॅप …

Read More »