पॉलिटेक्निकच्या पहिल्या वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया १० ऑगस्टपासून ऑनलाईन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील १० वी आणि १२ वीचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामुळे पुढील शिक्षणासाठीच्या प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून १० वी आणि १२ वी नंतर पॉलिटेक्निकच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १० ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२० या कालावधीत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

त्यासाठी विद्यार्थ्यांनी www.dtemaharashtra.gov.in या वेबसाईटवर/ संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.  पॉलिटेक्निकसाठी प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पदविका प्रवेश परिक्षेसाठी ३३६ सुविधा केंद्राची निवड तर १२ वी नंतरच्या पदविका अभ्यासक्रमासाठी २४२ सुविधा केंद्राची निवड करण्यात आली आहे. या केंद्रावर प्रत्यक्ष जावून कागदपत्रांची छानणी करण्यासाठी प्रत्यक्ष ठिकाणी जाणे टाळण्यासाठी ई-स्क्रुटनी संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यासाठी अर्ज करण्यापासून ते प्रवेश निश्चित करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सुविधा केंद्रावर जाण्याची पाळी येणार नाही. तसेच कोरोना विषाणूपासून स्वत:चा बचाव करता येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

About Editor

Check Also

‘एनटीए’ परीक्षा आयोजनाच्या दृष्टीने उच्चस्तरीय समितीची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा ‘एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्य शासनाचा सहभाग वाढविण्यावर भर

राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) आयोजित विविध राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचे आयोजन अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सुरळीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *