राहुल गांधी यांचा इशारा, या सरकारला हटविण्याची वेळ आलीय धर्मेद्र प्रधान यांचा राजीनामा हा शिक्षण व्यवस्थेच्या पुर्नबांधणीच्या दिशेने मोठे पाऊल

नीट परिक्षा पेपर फुटी प्रकरणावरून कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील तरूणांनी केंद्र सरकारच्या विरोधात आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मागील एक महिन्यापासून जंतर मंतरवर आंदोलन करण्यात येत होते. अखेर आंदोलकांच्या दबावापुढे मोदी सरकारला झुकावे लागले आणि शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या सरकारला हटविण्याची वेळ आली असल्याचा इशारा दिला.

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ जारी करत या सरकारला हटविण्याची वेळ आली असल्याचे म्हणाले. तसेच प्रधान यांचा राजीनामा म्णजे शिक्षण पुर्नबांधणीच्या दिशेने मोठे एक पाऊल असल्याचे सांगत कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलक विद्यार्थ्यांना शाब्बासकी देत आम्हाला तुमचा अभिमान असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, लोकशाही, संविधान आणि त्यांच्या भविष्याच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरून ठामपणे उभे राहिलेल्या प्रत्येक तरुण आणि विद्यार्थ्याचे मनःपूर्वक अभिनंदन.

राहुल गांधी पुढे म्हणाले, आमच्या दोन मागण्या आहेत: पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांचा आणि भारताच्या भविष्याचा आदर राखून माफी मागावी आणि विद्यार्थ्यांवरील हिंसाचारास जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी अशी मागणीही यावेळी केली.

शेवटी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, समाजातील इतर घटकांच्या—शेतकरी, मजूर, गरीब आणि या सरकारने दडपून चिरडलेल्या प्रत्येकाच्या—सन्मानासाठी घटनात्मक मार्गाने उभे राहण्यातच खरे धैर्य आहे. हे सरकार हटवण्याची वेळ आली आहे असा इशाराही यावेळी दिला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, मुलींवर अत्याचार व लाठीचार्ज, देवाभाऊ म्हणवून घेणाऱ्याची कृती मात्र दुर्योधनाची विद्यार्थ्यांच्या मागण्या व समर्थनासाठी निघणाऱ्या मोर्चांना काँग्रेसचा पाठिंबा

आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या तरुण मुला-मुलींवर देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस अत्यंत राक्षसी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *