रामदास आठवले यांचा आरोप, विकास बनसोडे बौध्द युवकाची हत्या ऑनरकिलिंगमधूनच खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी

बीड जिल्हातील आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी या गावात ट्रक चालक म्हणुन काम करणाऱ्या बौध्द युवक विकास बनसोडे यांची प्रेम प्रकरणाच्या संशयावरून अत्यंत निर्घुण हत्या करण्यात आली. दोन दिवस घरात डांबुन ठेवून बेदम मारहाण करुन क्रूरपणे आकाश बनसोडेची हत्या करण्यात आली. या निर्घुण हत्येचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करीत आहोत. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या हत्याकांडातील मारेकऱ्यांना कठोरात कठोर फाशीची शिक्षा करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

रामदास आठवले पुढे बोलताना म्हणाले की, मयत विकास बनसोडे हा मुळचा जालना जिल्हातील भोकरदन तालुक्यातील बोरगाव तरीचा रहिवाशी आहे. प्रेम प्रकरणाच्या संशयातुन विकास बनसोडे ची झालेली हत्या ऑनरकिलिंगचा प्रकार आहे. काही दिवसांपूर्वी पुणे जिल्हयात भोर तालुक्यात ऊत्रोली गावातील विक्रम गायकवाड हा बौध्द युवक ऑनरकिलिंगचा बळी ठरला होता. जातीवादातुन घडणाऱ्या या ऑनरकिलिंगच्या घटनांचा आम्ही तीव्र निषेध करतो. दलित बौध्द युवकांच्या ऑनरकिलिंगमुळे झालेल्या या दोन्ही हत्या प्रकरणाचा सखोल तपास करुन सर्व आरोपींना अटक करावी आणि हा खुन खटला जलदगती न्यायालयात चालवून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली.

पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले की, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ऑनरकिलिंगच्या घटना रोखण्यासाठी यातील मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करण्यासाठी आणि पिडीतांना जलदगतीने न्याय देण्याकडे लक्ष द्यावे अशी मागणीही केली.

दरम्यान विकास बनसोडे हत्या प्रकरणी ६ आरोपी अटकेत आहेत. उर्वरित सर्व आरोपींना येत्या आठवड्यात अटक न केल्यास रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बीड मध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष आणि युवक आघाडी चे राज्य अध्यक्ष पप्पू कागदे यांनी दिला.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, तिसऱ्या मुंबईच्या विकासाला आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे गती मिळणार रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १०० एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र-वापर विकास प्रकल्प, मॅपलट्रीकडून १.१ अब्ज डॉलरपेक्षा अधिक FDI अपेक्षित; सुरबाना ज्युराँगची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि त्यापलीकडील परिसर हा देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र बनण्याची क्षमता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *