पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच ५४ हजार कोटींच्या मागण्या सादर करण्यात अजित पवार यांनी विधिमंडळात सादर केल्या. त्यावरील चर्चेला आजपासून सुरूवात करण्यात आली. यावेळी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी बोलताना राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना कर्जत-जामखेडला चांगला निधी येत होता. मात्र आता अजित पवार यांनी अपनो को किया पराया अशी स्थिती असल्याचं वक्तव्य करत अजित पवार यांना निधी वाटपावरून टोला लगावॉत आपली व्यथा मांडली.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमच्या कर्जत-जामखेड मतदारसंघाला मोठ्या प्रमाणात निधी मिळत होता. कदाचित त्यावेळी काही लोक आमच्याबरोबर होते. आमच्याजवळ होते. त्यामुळे आमच्या मतदारसंघाला मोठ्या प्रमाणात निधी देत होते. मात्र दुर्दैवाने नंतरच्या काळात अपने हुऐ पराये किंवा अपनोंने किया पराया अशी स्थिती झाली आहे. माझ्या मतदारसंघात निधी येणं खूप कमी झाल्याचेही यावेळी सांगितले.
रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले की, निधी अभावी काम रखडत आहेत. अजित पवार यांना एक सांगायचं आहे की, शेवटी अपने तो अपने होते है, त्यामुळे अजित पवार यांना विनंती करतो की, तुम्ही सगळ्या गावाकडे बघत असता. मात्र गावकीकडे बघत असताना जरा भावकीकडेही बघाव. माझ्या मतदारसंघात निधी कमी पडतोय. मतदारसंघातील विकास कामांसाठी, माझ्या लोकांच्या भवितव्यांसाठी आम्हाला निधी देण्यात यावा, अजित पवार यांनी राजकारण बाजूला ठेवून आमच्या मतदारसंघाचा विचार करावा अशी विनंती असल्याचेही यावेळी सांगितले.
शेवटी बोलताना रोहित पवार म्हणाले की, मतदारसंघातील विकास कामाच भूमिपूजन ज्याला कोणाला करायचं असेल त्याला करू द्या. परंतु लोकांच्या अनेक मागण्या आहेत. आमच्या मतदारसंघातील लोकांशी संबधित मागण्या पूर्ण व्हाव्यात, प्रामुख्याने गृह विभागाशी संबधित मागण्या मांडल्या आहेत, त्या पैकी बहुसंख्य मागण्या मंजूर झालेल्या आहेत. मात्र निधी अभावी कामं सुरु झालेली नाहीत. त्यामुळे निधी देण्यात यावा अशी मागणीही केली.
Marathi e-Batmya