संजय गायकवाड यांना एकनाथ शिंदेंकडून कडक शब्दांत समज रितसर तक्रार करता आली असती, मारहाणीचे समर्थन करणार नाही

आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिळे अन्न दिल्याप्रकरणी मारहाण करणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडक शब्दांत समज दिली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ आमदार गायकवाड यांना समज दिली. लोकप्रतिनिधी या नात्याने रितसर तक्रार करता आली असती, पण मारहाणीचे समर्थन करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार संजय गायकवाड यांना आमदार निवासमधील कॅन्टीनचे निकृष्ट जेवण खाल्ल्याने उलटी झाली होती. इतरांना त्रास होऊ नये यासाठी आमदार गायकवाड यांनी त्वरीत कॅन्टीनमध्ये धाव घेत अन्नाच्या दर्जाबाबत चौकशी केली.

याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, संजय गायकवाड यांनी केलेली मारहाण समर्थनीय नाही. लोकप्रतिनिधी या नात्याने अन्नाच्या दर्जाबाबत रितसर तक्रारी करुन त्यावर कायदेशीर कारवाई करता येऊ शकते, पण मारहाण करणे हा पर्याय असू शकत नाही. संजय गायकवाड यांना समज दिली असून असं करणं योग्य नाही, आम्ही याचं समर्थन करत नाही नसल्याचे सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *