शिवसेना उबाठा पक्षाचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना एक पत्र पाठवित अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार सुनिल शेळके यांच्या विरोधात तक्रार केली. या पत्रात संजय राऊत यांनी आमदार सुनिल शेळके यांच्या विरोधात गंभीर आरोप करत शेळके यांच्याकडून महाराष्ट्राची होणारी लुटमार थांबवावी अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. तर उत्खन्नाच्या माध्यमातून सरकारचा हजारो कोटी रूपयांचा महसूल सुनिल शेळके यांनी बुडविला असल्याचा गंभीर आरोप करत ही होणारी लुटमार थांबवावी अशी मागणी केली.
त्याबाबत आमदार सुनिल शेळके यांना विचारले असता म्हणाले की, संजय राऊत यांनी यांदर्भात पुरावे दिले तर खुलासा करेन असे सांगत याप्रश्नी अधिक बोलण्यास नकार दिला.
मा.मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस जी,
काय सुरू आहे महाराष्ट्रात?
थांबवा ही लुटमार!
@Dev_Fadnavis
@cbawankule
@AjitPawarSpeaks
@PMOIndia
@AmitShah pic.twitter.com/ClGyjIXF43— Sanjay Raut (@rautsanjay61) July 2, 2025
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविलेल्या पत्राबाबत बोलताना म्हणाले की, हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. सरकारला समर्थन देणाऱ्या पक्षाचे आमदार-खासदार महाराष्ट्राची लुटमार करत आहेत. त्याकडे मुख्यमंत्री फडणवीस याचं लक्ष नाही. मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी हजारो कोटी रूपयांची रॉयल्टी लुटली आहे. एमआयडीसीच्या जमिनीवर खाण उद्योग सुरु करून हजारो कोटी रूपयांची रॉयल्टी लुटल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यासंदर्भातील पुरावे आणि तपशील पाठविला आहे. आतापर्यंत राज्य सरकारमधील आमदारांच्या भ्रष्टाचाराची २१ प्रकरणं पुराव्यासहित पाठविल्याचेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, मी आतापर्यंत पाठविलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अद्यापपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, की त्यावर कारवाई करेन असे सांगितलेले नाही की त्याची दखल घेतलेली नाही असेही यावेळी सांगितले.
याबाबत आमदार सुनिल शेळके म्हणाले की, कोणत्याही प्रकारचे पुरावे नसताना संजय राऊत यांनी आरोप केलेले आहेत. मी सांगू इच्छितो की, तुमच्याकडे जी माहिती असल, पुरावे असतील ते सादर करावेत. जोवर पुरावे सादर केले जात नाहीत. तोपर्यंत मी खुलासा करणार नाही असे सांगितले.
Marathi e-Batmya