संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्त्ये एकमेकांसमोर

लोकसभा निवडणूकीच्या चवथ्या टप्प्यासाठी १३ मे ला मतदान होत आहे. महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघातही मतदान होत आहे. तत्पूर्वी चवथ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस असतानाच संभाजी नगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्त्ये आणि शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्त्ये समोरासमोर येत परस्पर विरोधी घोषण देऊ लागले. मात्र उशीराने का होईना पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना एकमेकांपासून दूर नेले.

शिवसेना शिंदे गटाने आणि भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान मंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिली. तर शिवसेना उबाठा गटाकडून चंद्रकात खैरे यांना उमेदवारी देण्यात जाहिर करण्यात आली. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांपर्यंत पोहोचून प्रचाराचा शेवटचा दिवस सत्कारणी लावण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यामुळे क्रांती चौकात काहीसे तणावपूर्व वातावरण निर्माण झाले.

तर दुसऱ्याबाजूला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे संदीपान भुमरे यांच्या पैठण येथील देशी दारूच्या दुकानातून मिळणाऱ्या भिंगरी या देशी दाऊच्या बाटल्या दाखवित भिंगरी भिंगरी अशी घोषणाबाजी करत संदीपान भुमरे यांच्या कार्यकर्त्यांना चिडवत होते.

दरम्यान संदीपान भुमरे यांनी त्यांच्या पत्नीच्या नावाने दोन मद्यविक्रीचे परवाने घेतल्याची तशी माहिती उमेदवारीच्या प्रतिज्ञापत्रात संदीपान भुमरे यांच्याकडूनच देण्यात आली. त्यानंतर शिवसेना उबाठा गटाकडून विरोधी उमेदवाराच्या विरोधातील प्रमुख हत्यार म्हणून त्याचा वापर करण्यात येत आहे. तर दुसऱ्याबाजूला भुमरे यांनी महाविकास आघाडीचे आणि शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना मुस्लिमस्नेही ठरविण्याचा प्रयत्न सुरु केला. यावरून संभाजीनगरमधील शिवसेना उबाठा आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचे कार्यकर्त्ये आज चांगलेच भिडल्याचे दिसून आले. अखेर परिस्थिती जास्तच तणावपूर्ण बनू लागल्याचे दिसू लागताच पोलिस आणि काही कार्यकर्त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

आज चवथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकीसाठी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने प्रचार फेरीला सकाळी सुरुवात झाली. या प्रचारफेरीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे ही सहभागी झाले होते. मात्र भुमरे यांनी १४ मद्याचे परवाने दोन वर्षात कसे मिळाले असा सवाल उपस्थित केला. यावेळी अंबादास दानवे यांनी देशी दारूच्या भिंगरी नावाच्या दोन दारूच्या बाटल्या हातात धरल्या आणि भिंगरी विक्रेता असे म्हणायला सुरुवात केली. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनीही भिंगरी भिंगरी अशी घोषणाबाजी सुरु केली.

About Editor

Check Also

शेतकरीविरोधी भाजपा सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसची ‘अन्नदाता संघर्ष पदयात्रा’ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वाखाली मानेगाव ते जळगाव जामोद पदयात्रा

केंद्रातील व राज्यातील भाजपा महायुतीच्या मागील १२ वर्षांच्या काळात शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतमालाला भाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *