अमित शाह यांचे अरविंद केजरीवाल यांना प्रत्युत्तर, ७५ री झाली तरी मोदीच

नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील आणि तिसरा कार्यकाळ पूर्ण करतील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी सांगितले. पुढील वर्षी पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे होत आहेत आणि १७ सप्टेंबर (पीएम मोदींचा वाढदिवस) हा त्यांचा कार्यालयातील शेवटचा दिवस असेल, या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दाव्याला प्रत्युत्तर देताना अमित शाह सांगितले.

अमित शाह हे आज हैद्राबाद येथे प्रचारासाठी आले होते, त्यावेळी ते बोलत होते, “मी अरविंद केजरीवाल आणि इंडिया आघाडीला सांगू इच्छितो की मोदीजी ७५ वर्षांचे झाल्याबद्दल आनंदी होण्याची गरज नाही. मोदीजी पंतप्रधान होऊ शकत नाहीत असे भाजपाच्या घटनेत लिहिलेले नाही. ते पुन्हा पंतप्रधान होतील आणि कार्यकाळही पूर्ण करतील, असे स्पष्ट केले.

नुकतेच, अंतरिम जामिनावर तिहार तुरुंगातून सुटलेले अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदी २०२५ मध्ये निवृत्त होणार आहेत का, असा सवाल भाजपाला केला. पंतप्रधान मोदी १७ सप्टेंबर रोजी ७५ वर्षांचे होत आहेत. त्यांनी एक नियम केला की पक्षातील नेते ७५ री नंतर निवृत्त होतील. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन आणि यशवंत सिन्हा यांना ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि आता पंतप्रधान मोदी १७ सप्टेंबरला निवृत्त होणार आहेत असा दावा केला.

केजरीवाल यांच्या टीकेला उत्तर देताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एक्सवरील पोस्टमधील दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेले दावे फेटाळून लावत पुढे म्हणाले की, आता ते मोदीजींच्या वयाचे कारण पुढे करून मार्ग शोधत आहेत. भाजपाच्या घटनेत कुठेही वयाची अशी तरतूद नाही… मोदीजी आमचे नेते आहेत आणि भविष्यातही आमचे नेतृत्व करत राहतील, असे सांगितले.

अरविंद केजरीवाल यांनी अंतरिम जामीनला क्लीन चिट मानू नये, असा टोला लगावत अमित शाह पुढे म्हणाले, अंतरिम जामीन फक्त १ जूनपर्यंत देण्यात आला आहे आणि २ जून रोजी केजरीवाल यांना ईडी समोर आत्मसमर्पण करावे लागेल. जर अरविंद केजरीवाल यांनी ही क्लीन चिट मानली तर त्यांची कायद्याबद्दलची समज कमकुवत आहे, असेच म्हणावे लागले अशी टीकाही केली.

About Editor

Check Also

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहिती, एकल महिला धोरणासाठी मसुदा समिती गठीत विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत आणि अविवाहीत महिलासांठीचे धोरण

राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांना विविध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *