सुनिल तटकरे यांची मागणी, खोपोली प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करावी खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय

खोपोलीत जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय असून त्या घटनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून निषेध व्यक्त करतोच शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपास यंत्रणांमध्ये व्यापकता आणून एसआयटी ( SIT) स्थापन करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर बोलताना केली.

सुनिल तटकरे पुढे बोलताना म्हणाले की, खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय असून या घटनेचा निषेध व्यक्त करत तपास यंत्रणांनी शीर्घगतीने तपास करून आरोपींना अटक करावी अशी मागणी करतानाच इतर बाबतीत जे बोलले जात आहे ते तथ्यहीन असल्याचेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, एखाद्या घटनेत तपास सुरू असतो त्यावेळी एखादे मतप्रदर्शन करणे उचित नसते. जी घटना घडली किंवा त्यांचे काय वादविवाद होते, याबद्दलची माहिती नक्कीच पोलीस विभागाकडे असणार आहे. माझ्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचा या प्रकरणाशी दुरान्वये संबंध नसावा असा विश्वास व्यक्त केला. तसेच पण शेवटी तपास सुरू आहे. त्यामुळे तपासात काही बाधा येईल असे कोणतेही वाक्य मी बोलणार नाही असेही यावेळी सांगितले.

सुनिल तटकरे म्हणाले की, थोरवेंना जे काही करायचे आहे ते करु द्या. शेवटी थोरवेंचा पूर्व इतिहास काय आहे हे त्यांच्या निवडणूक अर्ज प्रक्रियेत पाहू शकता आणि सुधाकर घारे यांचाही पाहू शकता नेमका कुणाचा पूर्व इतिहास काय आहे तो असा टोलाही यावेळी लगावला.

शेवटी बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, भरत गोगावले हे मंत्री आहेत आणि त्यांचा पूर्व इतिहास लोकांना माहित आहे. त्यांनीच मालवणच्या सभेत नेता बनायला काय लागते ते सांगितले आहे. यावर आता जास्त बोलायचे नाही असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

विलास तरे यांची मागणी, परकीय चलनवाढीसाठी शेतकऱ्यांनी निर्यातक्षम शेतमालाचे उत्पादन करावे भारताचा परकीय चलन साठ्यात वाढ करण्यासाठी केली मागणी

भारताच्या परकीय चलन साठ्यात वाढ होण्यासाठी देशातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच निर्यातक्षम शेतीमाल उत्पादनाकडे लक्ष केंद्रित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *