‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे, ज्येष्ठ गायिका पद्मश्री डॉ.अश्विनी भिडे-देशपांडे, कॉफीटेबल बुकचे निर्माते विनोद पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी आज प्रकाशन करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे, ज्येष्ठ गायिका पद्मश्री डॉ.अश्विनी भिडे-देशपांडे, कॉफीटेबल बुकचे निर्माते विनोद पवार, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे तसेच शिष्टमंडळातील सदस्य उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अतिशय सुंदर अशा कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करता आले याबद्दल अतिशय आनंद आहे. महाराष्ट्राचे प्रतिबिंब हे आपल्याला आपल्या वारीमध्ये दिसते, ते पंढरपुरात दिसते, ते विठ्ठलाच्या आराधनेत आपल्याला पाहायला मिळते. इतक्या वेगवेगळ्या कथा, प्रत्येक वारीमध्ये तयार होतात. ते सर्व कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून आपल्याला अनुभवता येणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तीर्थ आणि त्या तीर्थातला जो देव आहे, हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. त्याची माहिती, इतिहास किंवा त्यातल्या प्रमुख गोष्टी या कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून मिळाले.  माहिती आणि छायाचित्रे यामुळे हे कॉफी टेबल बुक संग्रहणीय झाले आहे. आपली सांस्कृतिक माहिती जर कोणाला द्यायची असेल, तर काय द्यावे तर यामध्ये या पुस्तकाचा समावेश झाला आहे. इन्टॅन्जिबल हेरिटेजमध्ये युनेस्कोला आता ही पंढरीची वारी सादर करण्यात येईल, यासाठी हे कॉफी टेबल बुक महत्त्वाचे ठरेल, असे सांगितले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांना आशा, मुंबईला जागतिक ज्ञान केंद्र बनविण्यात यूडब्ल्यूए महत्वपूर्ण भूमिका बजावेल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इंडिया, मुंबई कॅम्पसचे उद्घाटन

मुंबईला जागतिक दर्जाचे ज्ञान, नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि प्रतिभेचे केंद्र बनविण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांना युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *