शरद पवार यांची मिश्किल टीपण्णी, सुप्रिया सुळे समोर नाहीत….याचा अर्थ नॉट रिचेबल होऊ शकत नाही अजित पवार माझ्या संपर्कात

विधासनसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार नॉट रिचेबल असल्याची चर्चा आहे. अजित पवारांचा सध्या कुणाचाही संपर्क होत नसून, राष्ट्रवादीच्या सात ते दहा आमदारांसह ते नॉट रिचेबल असल्याची अफवा माध्यमांत आणि सोशल मीडियात उठली आहे. तसेच, अजित पवारांनी त्यांचे दोन दिवसांचे कार्यक्रमही रद्द केल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अशात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या शपतविधीचा फोटो ट्विट केला. त्यावर, किळसवाणे राजकारण, मी पुन्हा येईन, असं अंजली दमानिया यांनी लिहिले. यासंदर्भात शरद पवार यांनी मिश्किल टिपण्णी करत या चर्चेवर अजित पवार हे संपर्कात असल्याचे स्पष्ट केले.

शरद पवार यांनी आज सिव्हर ओक या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत जेपीसी आणि न्यायालयाच्या समितीच्या प्रश्नावर भूमिका मांडल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार यांच्याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले, मला तर माहित नाही तुम्ही कशाच्या आधारावर बोलताय ते. सुप्रिया सुळे इथे समोर नाहीत मात्र त्या घरात आहेत. याचा अर्थ त्या ‘नॉट रिचेबल’ होऊ शकत नाही. अजित पवार माझ्या संपर्कात आहेत असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी पत्रकांरानी अजित पवार ‘नॉट रिचेबल’ वर विचारलेल्या प्रश्नावर बोलताना दिले.

राज्यातील सत्तासंघर्षाबाबत प्रश्न विचारण्यात आले असता म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाची आम्ही वाट बघत आहोत. वेगळा निर्णय आला तर चांगली गोष्ट आहे असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

About Editor

Check Also

एकनाथ शिंदे यांच्या भावना, “नदी म्हणजे नारीशक्ती… गोदा ते नर्मदा जलयात्रेतून नवीन विकास मॉडेल!” “ इतिहास, अध्यात्म, विकास आणि नारीशक्तीचा हा महासंगम!”

नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ती ऊर्जा, शक्ती, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *