सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर दिली ही खाती राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या सहीने खात्याचे वाटप, वित्त विभाग गायब

अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या पदावर अर्थात विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदी आणि उपमुख्यमंत्री पदी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची आज निवड करण्यात आली. त्यानंतर अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री असताना वित्त अर्थात अर्थ खाते त्यांच्याकडे होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अर्थ खातेही सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात येईल अशी अटकळ बांधली जात होती. परंतु शपथविधीनंतर सुनेत्रा पवार यांच्या वाट्याला इतर बिन महत्वाची खाती राज्यपालांनी दिल्याचे दिसून येत आहे.

तशाही राज्याच्या राजकारणात आणि उपमुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच जबाबदारी पार पाडणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे राज्याचे अर्थ खाते दिले जाण्याची शक्यता कमीच असल्याचे बोलले जात होते. मात्र तरीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सकारात्मक वक्तव्य केली जात होती. तसेच राज्याच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाला आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला असताना अर्थ सारखे महत्वापूर्ण खाते सुनेत्रा पवार यांच्याकडे कसे सोपविणार अशी राजकिय सवालही उपस्थित करण्यात येत होता.

अखेर संध्याकाळी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी खाते वाटपाचे पत्र जारी करत सुनेत्रा पवार यांच्याकडे अजित पवार यांच्याकडे असलेले राज्य उत्पादन शुल्क विभाग, क्रिडा व युवक कल्याण विभाग आणि अल्पसंख्याक व औफाक विभाग अशा तीन खात्याचा कारभार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपविला आहे.

यातील क्रिडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्यांक व औफाक विभाग यापूर्वी अजित पवार असतानाच बन्सोड, दत्ता भरणे आणि शेवटी माणिकराव कोकाटे या मंत्र्यांकडे सुपुर्द करण्यात आले होते. आता तीच खाती सुनेत्रा पवार यांच्या वाट्याला देण्यात आली आहेत. तर अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार असून अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ते खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे सुपुर्द करण्यात येणार असल्याचे दस्तुर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

खाते वाटपाबाबत राज्यपालांचे पत्र

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची स्पष्टोक्ती, इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळावर वार्षिक १२४ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाढत्या इंधन खर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असला, तरी तत्काळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *