शिवसेना उबाठाच्या त्या सहा बंडखोर खासदारांना सुरक्षित ठिकाणी हलवले रात्री राजस्थान वरून मुंबईत येण्याची शक्यता

काल शिवसेना उबाठा पक्षाने बोलाविलेल्या बैठकीसाठी दिल्लीतील खासदारांना व्हिप जारी केल्यानंतरही ते सहा बंडखोर खासदारांनी बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. आता ते सहा खासदार फुटल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. हा शिवसेना उबाठा सेनेला मोठा धक्का मानला जात आहे. आता या सहा खासदारांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली असून, त्यांना वाय प्लस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तसेच त्यांना सुरक्षेच्या कारणामुळे दिल्लीतून इतरत्र हलवण्यात आले आहे. या खासदारांना दिल्लीमधून नेमके कुठे नेले? या खासदारांचं लोकेशन काय याची उत्सुकता लागलेली असतानाच त्या खासदाराचे लोकेशन राजस्थान मधील सुरक्षित ठिकाणी असल्याचे समजते. आज रात्री हे खासदार राज्यस्थान जयपुर मार्गे मुंबईत येण्याची शक्यता असून मुंबईत त्यांचा शिवसेना वर्धापनदिना निमित्त एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात पक्ष प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

शिवसेना उबाठाचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की,  त्या खासदारांना २५ कोटी मिळाले. काल रात्री १०-१० कोटी दिले. त्यांना राजस्थानमधील एका जागेत सुरक्षित हलवले आहे, असा गौप्यस्फोट करत पुढे भाजप नेते आणि गिरीश महाजन यांच्या विधानाचा समाचार घेताना संजय राऊत म्हणाले की, राडे करणार की नाही हे कोण ठरवणार. गिरीश महाजन पोलिसांच्या गाड्या बाजूला ठेवून या, आमच्याकडे राडे करण्याची क्षमता नाही, मग त्यांना वाय प्लस, सीआरपीएफची सिक्युरिटी, घरावर, मालमत्तेवर सुरक्षा का दिली? प्रत्येक गद्दारांना सिक्युरिटी देण्याचं कारण काय? तुम्ही सिक्युरिटी काढा तुमच्या अंगावर चिंधी राहणार नाही. तुमचे बॉस शिंदे हे सुरक्षा घेऊन फिरत आहेत. त्यांच्या चिरंजीवांकडे देखील सुरक्षा असल्याचा खोचक टोलाही यावेळी लगावला.

संजय राऊत पुढे असेही म्हणाले की, तुम्ही खाकी वर्दी, ईडी, सीबीआयची मस्ती दाखवत आहात. गिरीश महाजन म्हणाले खासदार कसे फुटले? माझ्याकडे एक दिवस सीबीआय, ईडी आली तर सर्वात आधी गिरीश महाजन यांना फोडून नाही दाखवलं तर बघा. अर्धा तास ईडी सीबीआय माझ्याकडे द्या. गिरीश महाजनला फोडतो. हा माणूस काय शिकवतो. कुंभमेळ्याचे कंत्राट कुणाला दिले. माझ्याकडे यादी आहे. तुम्हाला भीती नाही ना, मग तुमचे नगरसेवक ठाण्यात का लपवता. राडेबाजीवर आव्हान देऊ नका. आव्हान द्यायचं असेल तर पोलिस बाजूला ठेवून या. अर्धा तास ईडी सीबीआय आम्हाला द्या. गिरीश महाजन पहिले फुटतील, असा टोलाही यावेळी लगावला.

राजस्थान मध्ये एका सुरक्षित ठिकाणी असलेले ते सहा बंडखोर खासदार रात्री जयपुर मार्गे मुंबईत परतणार असून त्यांचा मुक्काम गोरेगाव येथील वेस्ट इन हॉटेल मध्ये असणार आहे तेथून ते शिंदे शिवसेनेच्या वर्धापण दिनाच्या कार्यक्रमाला कडेकोट बंदोबस्तात येथील नेस्को सेंटरमध्ये हजेरी लावणार आहेत. त्या ठिकाणी त्यांचा शिंदे गटात पक्ष प्रवेश होणाप आहे.

शिवसेना उबाठाचे ते सहा बंडखोर खासदार खालीलप्रमाणे

खासदार भाऊसाहेब वाघचौरे, नागेश पाटील आष्टीकर, संजय दिना पाटील, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, संजय देशमुख

 

 

About Editor

Check Also

एकनाथ शिंदे यांचे आवाहन, विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे कर्जमाफीपासून वाढवण बंदरापर्यंत, मेट्रोपासून लाडकी बहीण योजनेपर्यंत सरकारच्या कामांचा आढावा

शेतकरी, महिला, कष्टकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत महायुती सरकारने राज्याच्या सर्वांगीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *