भीमा कोरेगाव, इंदू मिल आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या पीपल्स रिपाईचे जोगेंद्र कवाडे, राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी
भीमा कोरेगाव व इंदू मिल आंदोलनातील आंबेडकरी कार्यकर्ते व युवकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये आणि पीपल्प रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनामार्फत केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.
भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीत अनेक महिला, युवक आणि कार्यकर्ते यांच्यावर गंभीर गुन्हे मागील सरकारने दाखल केले आहेत. शिवाय इंदू मिल आंदोलनातील युवकांवरही गुन्हे दाखल आहेत. तेही गुन्हे मागे घ्यावेत आणि दलित समाजाला न्याय द्यावा अशी मागणी या दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
दरम्यान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याप्रकरणी गुन्हे लवकरात लवकर मागे घेण्याचे आश्वासन दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी सांगितले.

About Editor

Check Also

महाड चवदार तळे सत्याग्रह दिनी रामदास आठवले यांचा सत्कार कोकण रिपब्लिकन संस्थेतर्फे होणार भव्य सत्कार

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या ९९व्या वर्धापन दिनी उद्या २० मार्च …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *