मुंबईः प्रतिनिधी
भीमा कोरेगाव व इंदू मिल आंदोलनातील आंबेडकरी कार्यकर्ते व युवकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये आणि पीपल्प रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनामार्फत केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.
भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीत अनेक महिला, युवक आणि कार्यकर्ते यांच्यावर गंभीर गुन्हे मागील सरकारने दाखल केले आहेत. शिवाय इंदू मिल आंदोलनातील युवकांवरही गुन्हे दाखल आहेत. तेही गुन्हे मागे घ्यावेत आणि दलित समाजाला न्याय द्यावा अशी मागणी या दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
दरम्यान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याप्रकरणी गुन्हे लवकरात लवकर मागे घेण्याचे आश्वासन दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी सांगितले.
Marathi e-Batmya