अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळा प्रवेशासाठी अर्ज करा

सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांनी केले आहे.

सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. या योजनेकरिता, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांच्या कार्यक्षेत्रात येणारे गाव/पाडे येथील अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह या कार्यालयास ३१ मे, २०२४ पर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठीचा अर्ज या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.

About Editor

Check Also

राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर साहित्य अकादमीतर्फे २०२५चे पुरस्कार जाहिर

साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणाऱ्या २०२५ या वर्षासाठी प्रतिष्ठेच्या  पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशातील मान्यताप्राप्त २४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *