उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांचे प्रतिपादन, ईडी आणि पंतप्रधान मोदींना घाबरत नाही नीती आयोगाच्या बैठकीला मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या उपस्थित राहण्याचे केले समर्थन

तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवारी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या नीती आयोगाच्या बैठकीतील सहभागाबद्दल विरोधी पक्षांच्या आरोपांवर जोरदार टीका केली आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) नेतृत्व अंमलबजावणी संचालनालय (ईडी) किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरत नाही असे प्रतिपादन केले.

पत्रकारांशी बोलताना उदयनिधी म्हणाले की, नवी दिल्लीतील बैठकीला उपस्थित राहण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय केवळ तामिळनाडूच्या लोकांसाठी योग्य आर्थिक वाटप मिळवण्याच्या हितासाठी होता. ते राज्यासाठी आवश्यक निधी मिळविण्यासाठी तिथे गेले आहेत. नेहमीप्रमाणे, विरोधी पक्ष या प्रकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोपही यावेळी केला.

गेल्या तीन वर्षांपासून नीती आयोगाच्या बैठकांवर बहिष्कार टाकल्याबद्दल द्रमुक सरकारवर टीका करणाऱ्या ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) नेते एडाप्पाडी के पलानीस्वामी यांच्या प्रश्नावर त्यांनी ही टिप्पणी केली. पलानीस्वामी यांनी आरोप केला की, मागील बहिष्कारामुळे तामिळनाडूला मोठा निधी खर्च करावा लागला असल्याचा सांगत दावा केला की, केंद्रीय एजन्सीच्या छाप्यांच्या भीतीमुळे, विशेषतः तामिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन (टीएएसएमएसी) शी संबंधित ईडीच्या अलिकडच्या कारवाईनंतर, एमके स्टॅलिन यांची या वर्षी उपस्थिती होती.

आरोप फेटाळून लावताना उदयनिधी स्टॅलिन यांनी धमकी देण्याच्या कोणत्याही सूचनेला जोरदारपणे नकार देत म्हणाले की, आम्ही ईडीला घाबरत नाही. मी हे अनेक वेळा सांगितले आहे – फक्त ईडीच नाही, आम्ही पंतप्रधान मोदींनाही घाबरत नाही, असेही यावेळी सांगितले.

उदयनिधी स्टॅलिन पुढे बोलताना म्हणाले की, त्यांनी आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न केला, पण आमचा शरणागती पत्करणारा गुलाम पक्ष नाही. हा पक्ष कलैग्नारने निर्माण केला होता, जो पेरियार यांच्या विचारसरणीत रुजलेला होता. जे दोषी आहेत त्यांनाच घाबरण्याची गरज आहे. आम्ही कायदेशीररित्या सर्वकाही सामोरे जाऊ, असा निर्धारही यावेळी व्यक्त केला.

नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक शनिवारी राष्ट्रीय राजधानीत झाली आणि त्यात केंद्र आणि राज्यांमधील धोरणात्मक बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले.

About Editor

Check Also

२०२३ मध्ये मुंबई विमानतळावर व्हीएसआर व्हेंचर्सच्या विमान अपघाताचा अंतिम अहवाल जाहिर व्हीएसआर व्हेंचर्सच्या लियरजेट ४५एक्सआर विमानाचे अस्थिर लँडिंग

विमान अपघात अन्वेषण ब्युरोने (AAIB) आपल्या अंतिम अहवालात असा निष्कर्ष काढला आहे की, सप्टेंबर २०२३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *