सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड म्हणाले, मला कामकाजाबाबत सांगू नका, हे मी ठरवेन संतापून वकील विकास सिंह यांना झापलं

मागील काही वर्षात न्यायालयातील अपूऱ्या न्यायाधीशांची संख्या असतानाही तत्कालीन सरन्यायाधीश यु यु लळीत आणि विद्यमान सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड हे प्रलंबित असलेल्या खटले निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात आज वरिष्ठ वकील विकास सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात खटला सूचिबद्ध करण्यावरून सरन्यायाधीशांकडे आग्रह धरला. यावेळी संतापलेल्या सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विकास सिंह यांना सुनावत, “मला न्यायालयीन कामकाजाबाबत सांगू नका, माझ्या न्यायालयात कामकाज कसं चालणार, हे मी ठरवेन” अशा शब्दांत सरन्यायाधीशांनी आपला संताप व्यक्त केला.

वरिष्ठ वकील विकास सिंह यांनी वकिलांना चेंबर वाटपाच्या प्रकरणाचा उल्लेख करत, संबंधित खटला याच आठवड्यात सूचिबद्ध करण्यात यावा, अशी मागणी केली. तथापि, सरन्यायाधीशांनी त्यांना सांगितलं की, हे प्रकरण या आठवड्यात सूचीबद्ध करणं थोडं कठीण आहे. त्यामुळे याची सुनावणी ३ फेब्रुवारीला करता येईल.

पण विकास सिंह यांनी हे प्रकरण लवकरात लवकर सुनावणीसाठी घेण्याचा आग्रह धरला. तसेच सूचीबद्ध प्रकरणांची सुनावणी करणे, हे न्यायालयाचं काम आहे, असा युक्तीवाद सिंह यांनी केला. यानंतर सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, “मला कामकाज कसं करायचं हे सांगू नका, माझ्या न्यायालयात कामकाज कसं चालणार, हे मी ठरवेन. काल माझ्याकडे वेळ नव्हता, त्यामुळे मी सुनावणी घेऊ शकलो नाही. संध्याकाळी ६ वाजता सुनावणी ठेवली तर याचा वकिलांना त्रास होईल. तसेच माझ्याकडेही इतर प्रशासकीय कामं आहेत,” अशा शब्दांत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी वरिष्ठ वकील विकास सिंह यांना झापलं.

About Editor

Check Also

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीच स्टार्ट अपसाठी १० हजार कोटींचा निधी, उद्योगांना निधी केंद्र सरकारकडून प्रसिद्धी पत्रक जारी करत दिली माहिती

शनिवारी (१४ फेब्रुवारी २०२६) केंद्र सरकारने सांगितले की त्यांनी मोबाईल व्हेंचर कॅपिटल आणि डीप टेक, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *