यंदाचा विं.दा. पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर भाषा अभ्यासक अविनाश बिनीवाले, वरदा प्रकाशन आणि मराठी विज्ञान परिषदेलाही पुरस्कार

मुंबई : प्रतिनिधी

मराठी भाषे दिनानिमित्त राज्य सरकारकडून देण्यात येणारा यंदाचा विं.दा.करंदीकर पुरस्कार ज्येष्ठ मराठी साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर झाला. तर डॉ. अशोक केळकर पुरस्कार भाषा अभ्यासक अविनाश बिनीवाले, श्री.पु.भागवत प्रकाशन पुरस्कार पुणे येथील वरदा प्रकाशनाला  आणि भाषा संवर्धन पुरस्कार मराठी विज्ञान परिषदेला देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली.

मंत्रालयातील विधीमंडळ व मंत्रालय वार्ताहर संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

तसेच या पुरस्काराचे वितरण २७ फेब्रुवारी २०१८ रोजी अर्थात मराठी भाषा दिनी नरीमन पाँईट येथील यशवंतराव प्रतिष्ठान येथे होणार आहे. त्याचबरोबर विविध साहित्य प्रकारांचे ३५ राज्य वाड़मय पुरस्कारांचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नेमक्या याच कालावधीत विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु होत आहे. त्यामुळे मराठी भाषा दिनानिमित्त औचित्य साधत सर्व विधिमंडळाचे सदस्य विधानभवनाच्या प्रांगणात एकत्रित येत प्रसिध्द कवी स्वर्गिय सुरेश भट यांच्या काव्याचे सामुहीक वाचन करण्यात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय राज्यातील सर्व शाळांमध्येही सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून विद्यापीठाच्या बाहेरही कार्यक्रमाचे आयोजन करण्यास सर्व विद्यापीठांना सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय या दिवशी प्रत्येकाने मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

About Editor

Check Also

भारत- ब्राझील दरम्यान होणार २० अब्जहून अधिकचा व्यापार द्विपक्षिय चर्चेत व्यापार वाढविण्याबाबत दोन्ही देशांचे एकमत

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नवी दिल्ली येथे ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इन्सियो लुला दा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *