या खेळाडूंना राज्य सरकारने दिले प्रत्येकी ५० लाख रूपये ऑलम्पिंक स्पर्धेच्या तयारीसाठी प्रोत्साहन निधी

मुंबई : प्रतिनिधी

टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंना पूर्व तयारीसाठी प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी ५० लाख रुपये असे २.५० कोटी रक्कम आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आली.

वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या कार्यक्रमात स्वरूप उन्हाळकर ( शूटिंग पॅराऑलिम्पिक), राही सरनोबत ( शूटिंग),  तेजस्विनी सावंत ( शूटिंग), प्रवीण जाधव ( आर्चरी रिकर्व्हर सांघिक), अविनाश साबळे ( एथलेटिक्स) या ५ खेळाडूंना हे सहाय्य देण्यात आले. या खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी कोटा मिळाला आहे. मिशन ऑलिम्पिकअंतर्गत अशा स्वरूपाचे प्रोत्साहन देण्यात आले

उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा राज्य मंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव संजय कुमार , मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, शालेय शिक्षण व क्रीडा अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया उपस्थित होते

About Editor

Check Also

कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके म्हणाले, दिवाळीपर्यंत आंदोलने आयोजित करण्याची योजना नाही आंदोलनांतून काही काळ विश्रांती घेण्याची आणि आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची वेळ आली

‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी मंगळवारी जाहीर केले की, दिवाळीपर्यंत त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *