शिक्षणतज्ञ आणि पर्यावरण-हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी म्हटले आहे की, ते “आधुनिक गांधी” किंवा नायक नसून “फक्त एक सामान्य नागरिक” आहेत. त्यांनी लोकांना नेतृत्वासाठी दुसऱ्या कोणाचीही वाट न पाहता नागरिक म्हणून जबाबदारी घेण्याचे आवाहन केले. नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनाचा शनिवारी २२ वा दिवस उजाडला असताना सोनम वांगचुक यांनी ही टिप्पणी केली.
२८ जून रोजी आंदोलनात सामील झालेले सोनम वांगचुक, त्यांच्या अनिश्चितकालीन उपोषणाला १४ दिवस होत आहेत. सीजेपी संघटनेने दिलेल्या आरोग्यविषयक माहितीनुसार, उपोषण सुरू केल्यापासून आता पर्यंत त्यांचे ९ किलो वजन कमी झाले आहे आणि त्यांचा रक्तदाबही कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
शुक्रवारी रात्री एक्स (X) वर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये सोनम वांगचुक म्हणाले की, त्यांना आदल्या दिवसापेक्षा कमी ऊर्जा जाणवत आहे, परंतु ते आंदोलनासाठी कटिबद्ध आहेत. “आज, माझ्या उपवासाच्या तेराव्या दिवशी, मला कालसारखी ऊर्जा जाणवत नाहीये. मला थोडा थकवा जाणवत आहे. असं होतं — काही दिवस चांगले असतात आणि काही नसतात,” असेही यावेळी म्हणाले.
सोशल मीडियावर आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल लोकांचे आभार मानताना सोनम वांगचुक म्हणाले की, दोन प्रकारच्या प्रतिक्रियांमुळे त्यांना निराशा झाली.
सोनम वांगचुक पुढे बोलताना म्हणाले की, बरेच लोक मला २१ व्या शतकातील गांधी किंवा आधुनिक गांधी म्हणतात. तर काही जण मला नायक म्हणतात. या प्रतिक्रियांमुळे मला अस्वस्थ वाटते. मी गांधीही नाही आणि नायकही नाही. मी फक्त एक सामान्य नागरिक आहे. ज्याने आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.
Who is a Real Hero? #cockroachjantaparty #education pic.twitter.com/CcdLHmj1le
— Sonam Wangchuk (@Wangchuk66) July 11, 2026
सोनम वांगचुक पुढे म्हणाले, कृपया दुसऱ्या कोणामध्ये नायक शोधू नका. तुम्ही तुमच्या आयुष्याचे नायक बना. एक नागरिक म्हणून तुमची जबाबदारी पार पाडा. असे आवाहनही यावेळी केले.
सीजेपीने कथित नीट परिक्षा फुटी आणि इतर परिक्षांमध्येही पेपर फुटीच्या घटना विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचा संदर्भ देत, सोनम वांगचुक यांनी लोकांना निष्क्रिय न राहता आंदोलनात सामील होण्याचे आवाहन केले.
DAY 13 UPDATE
I’m no Gandhi, nor hero…
It pains me when some say in comments… you’re modern Gandhi… You’re the real Hero.I’m just a citizen fulfilling the responsibilities of citizenship. So can you. Please stop looking for heroes in others. Be the hero of your own life… pic.twitter.com/0Ta30ieZs7
— Sonam Wangchuk (@Wangchuk66) July 10, 2026
सोनम वांगचुक म्हणाले की, जर त्या विद्यार्थ्यांपैकी कोणी तुमची बहीण किंवा मुलगी असती, तर तुम्ही आमच्यात सामील झाला असता. पण त्यासाठी थांबू नका. जर तुम्ही दररोज इथे येऊ शकत नसाल, तर किमान एक दिवस तरी जंतर मंतरवर आमच्यात सामील व्हा. जर तुम्ही दिल्लीला येऊ शकत नसाल, तर तुम्ही जिथे असाल तिथे उपवास करा आणि तुमचा संदेश पोहोचवा,” असे आवाहनही यावेळी केले.
आंदोलकांनी उपस्थित केलेले मुद्दे खासदारांनी विचारात घ्यावेत यासाठी, २० जुलै रोजी संसदेवर होणाऱ्या प्रस्तावित मोर्चात सामील होण्याचे आवाहनही सोनम वांगचुक यांनी पुन्हा केले. “आमच्याप्रमाणे तुम्हाला २४ दिवस उपाशी राहण्याची गरज नाही. जेवण झाल्यावर या. पण नागरिक म्हणून जबाबदारी घ्या आणि २० जुलै रोजी आमच्यात सामील व्हा,” अशी आर्त हाकही देशातील जनतेला केली.
शुक्रवारी, सोनम वांगचुक म्हणाले की, उपवासाच्या सुरुवातीच्या दिवसांनंतर त्यांची भूक “स्थिर” झाली आहे आणि त्यांनी ठामपणे सांगितले की, त्यांना आंदोलनाच्या ठिकाणाहून हटवण्याचा कोणताही प्रयत्न हा शांततापूर्ण आंदोलन करण्याच्या त्यांच्या घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन ठरेल. मी येथे स्वेच्छेने आलो आहे आणि माझ्या जीवाला कोणताही धोका नाही. जर त्यांनी मला हटवले, तर तो आमच्या हक्कांचे उल्लंघन ठरेल, अशी आठवण करून देत पेपर फुटी प्रकरणाची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि लडाखशी संबंधित प्रश्नी लवकरात लवकर निराकरणासाठी आपण उपोषण सुरू ठेवत असल्याचेही यावेळी सांगितल
सीजेपीने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि कथित परीक्षा अनियमिततेमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
सीजेपी संघटनेने २० जुलै रोजी, पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी , संसदेवर शांततापूर्ण मोर्चा काढण्याची घोषणाही केली आहे. हे आंदोलन २० जून रोजी सुरू झाले आणि आठ दिवसांनंतर त्यात सामील झाल्यापासून सोनम वांगचुक अनिश्चित काळासाठी सरकारच्या निषेधार्थ बसले आहेत.
DAY 12 UPDATE
CHALO SANSAD
A peaceful march to the Indian Parliament.
Most countries in the democratic world are not only accessible but welcoming to general public. Most even have a protest place right in front, so there’s no reason this shouldn’t be possible in the capital of… pic.twitter.com/4u7YAd3O9z— Sonam Wangchuk (@Wangchuk66) July 10, 2026
Marathi e-Batmya