Tag Archives: सीजेपी

मद्रास उच्च न्यायालयात सीजेपीचे सौरव दास यांच्या वक्तव्या प्रकरणी आधार, पासपोर्ट रद्द करण्यासाठी याचिका पार्श्वभूमीची चौकशी करा, पासपोर्ट आणि आधार कार्ड रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका

मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे प्रवक्ते आणि पत्रकार सौरव दास यांना, तसेच केंद्र सरकारच्या विविध संबंधित प्राधिकरणांना नोटीस बजावली आहे. सौरव दास यांनी न्यायव्यवस्थेबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप करत, त्यांच्या पार्श्वभूमीची चौकशी करावी, त्यांचा पासपोर्ट आणि आधार कार्ड रद्द करावे, तसेच त्यांची सोशल मीडिया खाती बंद …

Read More »

निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर ही आता सीजेपीच्या अभिजीत दीपके यांच्यासोबत एकाच मंचावर येणार एसआयआरच्या विरोधात देशव्यापी आंदोलनात सहभागी होणार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ पराकला प्रभाकर, ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके आणि अभिनेते व कार्यकर्ते प्रकाश राज यांच्यासोबत एका व्यासपीठावर येणार आहेत. हे सर्वजण निवडणूक मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या विरोधात आयोजित देशव्यापी आंदोलनात सहभागी होणार आहेत. …

Read More »

सीजेपीचे आशुतोष रांका आणि सौरव दास यांची अखेर सुटका दोन दिवसाची वाढीव कोठडी देण्यात आली होती, परंतु टीका होऊ लागल्याने सुटका केली

एका विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी (Special Executive Magistrate – SEM) बुधवारी ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांची सुटका करण्याचे आदेश दिले. १४ ऑक्टोबर रोजी जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनाप्रकरणी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती, ज्याची मुदत संपत आली होती. या दोघांना विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा इशारा, होय, आम्ही रिजीम चेंजसाठी उभारलोय शिवसेना उबाठाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांची घोषणा

केंद्रात आणि राज्यात मत चोरीतून आलेल्या सरकारची सत्ता बदलण्यासाठी-रिजीम चेंज करण्यासाठी आम्ही उभे आहोत. कारण नागरिकांच्या मतांचा अधिकार डावलत सत्तेवर आलेल्यांची सत्ता बदलल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला. तसेच मागे पेपर लिक प्रकरणांनी देशाती तरूणांनी आंदोलन केले. त्यावेळी मंत्री धर्मेंद्र प्रधान …

Read More »

कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके म्हणाले, दिवाळीपर्यंत आंदोलने आयोजित करण्याची योजना नाही आंदोलनांतून काही काळ विश्रांती घेण्याची आणि आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची वेळ आली

‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी मंगळवारी जाहीर केले की, दिवाळीपर्यंत त्यांच्या संघटनेची कोणतीही आंदोलने आयोजित करण्याची योजना नाही. त्यांनी आपल्या समर्थकांना हा सणासुदीचा काळ आपल्या प्रियजनांसोबत घालवण्याचे आवाहन केले. अभिजीत दीपके यांनी भर दिला की, सीजेपी CJP च्या समर्थकांसाठी — ज्यांना ते ‘कॉकरोच’ (झुरळे) असे संबोधतात …

Read More »

सीजेपीचे आशुतोष रांका आणि सौरभ दास यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी वाढवली कोठडी

कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) नेते आशुतोष रांका आणि सौरभ दास यांची न्यायालयीन कोठडी एका विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी दोन दिवसांनी वाढवली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, त्यांच्या कायदेशीर टीमने जामीनदार सादर करून त्यांच्या सुटकेची मागणी केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. सीजेपीच्या कायदेशीर टीमने सौरव दास …

Read More »

लेहरा दो तिरंगा आंदोलनापूर्वीच दिल्ली पोलिस सीजेपीचे अभिजीत दीपके यांच्या घराजवळ पोलिसांकडून अभिजीत दीपके यांना नोटीस

काही तासांपूर्वी, ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी अशी शक्यता वर्तवली होती की, मध्य दिल्लीत आयोजित ‘लेहरा दो तिरंगा’ (तिरंगा फडकवा) या मोहिमेपूर्वी त्यांना ताब्यात घेतले जाऊ शकते. शुक्रवारी दुपारी, दिल्ली पोलिसांचे पथक झंडेवालान येथील त्या निवासस्थानी पोहोचले जिथे अभिजीत दीपके राहत होते. तिथे पोलिसांनी त्यांना एक …

Read More »

राहुल गांधी यांचा सीजेपीला पाठिंबा सीजेपी नेत्यांच्या अटकेवर राहुल गांधी यांची सीजेपीच्या समर्थनार्थ भूमिका

गेल्या काही महिन्यांत, परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटण्यापासून ते एसआयआर ‘SIR’ प्रक्रियेपर्यंत अनेक मुद्द्यांवर काँग्रेस आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) यांची भूमिका एकच राहिली आहे; तरीही त्यांनी कधीही एकाच मंचावरून एकत्र आवाज उठवला नाही. राहुल गांधी आणि अभिजीत दिपके यांनी एकमेकांपासून, अगदी सोशल मीडियावरही, बऱ्याच अंशी अंतर राखले होते. मात्र, बुधवारी यात …

Read More »

सीजेपी ची घोषणा, युद्ध आता कुठे सुरु झाले, आमचे फोन २४ तासापासून पोलिसांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी निर्माण झालेल्या युद्धासारखा सुरु झाला

रविवारी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटका झाल्यानंतर काही तासांतच, ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी आरोप केला की, अटकेत असताना त्यांचे फोन २४ तास पोलिसांच्या ताब्यात होते. तसेच, त्यांच्या उपकरणांची (फोन्सची) ‘क्लोनिंग’ केली गेली असावी किंवा त्यात फेरफार केले गेले असावेत, अशी भीतीही व्यक्त केली. …

Read More »

सीजेपीचे अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची आज सकाळी सुटकेचे आदेश बंधपत्रावर स्वाक्षरी केल्यानंतर सुटका करण्याचे आदेश

‘कॉकरोच जनता पार्टी’चे-सीजेपी (CJP) कार्यकर्ते अभिजित दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची पोलीस कोठडीतून सुटका करण्याचे आदेश ‘विशेष कार्यकारी दंडाधिकारी’ (SEM) न्यायालयाने रविवारी सकाळी दिले. सीजेपीचे अभिजीत दीपके, सौरव दास, आशुतोष रांका यांना आज सकाळी विशेष कार्यकारी दंडाधिकारी संहामित्रा यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने एका ‘नमुना’ (template) बंधपत्रावर स्वाक्षरी …

Read More »