इराणच्या राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी शेजारील राष्ट्रांची माफी मागत केली ही घोषणा जोपर्यंत दुसऱ्या राष्ट्रातून हल्ला होत नाही तोपर्यंत हल्ला न करण्याचे धोरण

इस्त्रायल आणि अमेरिकी सैनिकांनी इराणवर हल्ला करत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह तेथील लष्करी अधिकाऱ्यांचा खात्मा केला. तसेच इराणच्या अण्वस्त्र स्थळांवरही हल्ले करत मोठ्या प्रमाणावर इराणचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या पार्श्वभूमीवर मध्यपूर्वेतील मुस्लिम राष्ट्रातील अमेरिकी सैन्य स्थळांवर इराणने हल्ले करत अमेरिका प्रतित्तुर देण्याचा प्रयत्न केला. तसेच हल्ल्यांचे प्रक्षेपणही केले. मात्र आता इराणची सर्वोच्च सत्ता खामेनी यांच्यानेतर नेतृत्व परिषदेकडे हस्तांतरीत केली आहे. यामुळे या नेतृत्व परिषदेने शेजारील राष्ट्रांमधील अमेरिकी तळांवर हल्ले थांबविण्याचा निर्णय घेत जोपर्यंत हल्ले होत नाहीत. तोपर्यंत इराणही हल्ला करणार नसल्याचा निर्णय घेतला असल्याचे इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ मसूद पेझेश्कियान यांनी सांगितले.

पुढे बोलताना मसूद पेझेश्कियान म्हणाले की, मी शेजारच्या देशांची माफी मागतो. इतर देशांवर आक्रमण करण्याचा कोणताही हेतू नव्हता. तथापी अमेरिका आणि इस्रायल समोर शरणागती पत्करणार नाही. इराणने बिनशर्त शरणागती पत्करावी, अशी इच्छा शत्रुंनी व्यक्त केली असली तरी त्यांची इच्छा त्यांच्याबरोबरच त्यांच्या थडग्यात पुरली जाईल असा इशाराही यावेळी दिला.

अमेरिका आणि इस्त्रायलने इराणची राजधानी तेहरानवर हल्ले केल्यानंतर युद्धाला तोंड फुटले. त्यास प्रत्युत्तर म्हणून इराणनेही शेजारच्या आखाती देशातील अमेरिकेच्या हवाई आणि लष्करी तळांना लक्ष्य केले. दुबई, अबु धाबी, युएई सारख्या मोठ्या शहरांमध्ये क्षेपणास्त्र डागण्यात आली. तसेच कुवैत, ओमान, कतार आणि सौदी अरेबियालाही लक्ष्य करण्यात आले.

आतापर्यंतच्या अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्लात सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर इराणकडून अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधातील इराणच्या हल्ल्यांना चांगलीच धार वाढली. या हल्ल्यानंतर अमेरिकेनेही इराणविरोधातील हल्ले आणि भूमिका आणखी कठोर केली. बिनशर्त शरणागती पत्कारल्याशिवाय इराणसोबत कोणताही करार नाही अशी भूमिका आता अमेरिकेने ठरविली आहे.

About Editor

Check Also

ममता बॅनर्जी यांच्या गटाच्या उमेदवाराची माघार, इंडिया आघाडीच्या पाठिशी असल्याचे केले जाहिर नंदीग्राम पोट निवडणूकीत उमेदवार बनला विधानसभा विरोधी पक्षनेता

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी नंदीग्राम पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *