कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांचा शपथविधी सोहळा होणार साधेपणाने यापूर्वी गर्दीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी डी के शिवकुमार यांना दिला इशारा

कर्नाटकभरातून काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थकांच्या अपेक्षित गर्दीमुळे बंगळूरमधील वाहतुकीत व्यत्यय येण्याच्या चिंतेमुळे, भावी मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी रविवारी जाहीर केले की, ३ जून रोजी होणारा त्यांचा शपथविधी सोहळा साधेपणाने पार पडेल.

बुधवारी दुपारी ४.०५ वाजता लोक भवन येथे कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असलेल्या डी के शिवकुमार यांनी सांगितले की, जनतेची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि त्यांना कमीत कमी गैरसोय व्हावी यासाठी पक्षाचे नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.

डी के शिवकुमार म्हणाले की, “आज कामकाजाचा दिवस असल्याने आम्हाला बंगळूर शहरात गोंधळ नको आहे. पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थकांना राजधानीत आणण्यासाठी १७,००० हून अधिक वाहने आधीच बुक करण्यात आली आहेत. वाहतूक विस्कळीत होण्याची आणि जनतेच्या तक्रारींची पोलिसांना चिंता होती,” असेही यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

डी के शिवकुमार पुढे बोलताना म्हणाले की, कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीने (केपीसीसी) पक्षाच्या नेत्यांना आधीच कळवले आहे की हा सोहळा केवळ प्रमुख मान्यवरांपुरता मर्यादित असेल. बंगळूरूमध्ये गोंधळ टाळण्यासाठी आम्ही लोक भवन येथे साधेपणाने शपथविधी सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला सामान्य लोकांनाही मदत करायची आहे, असेही यावेळी सांगितले.

कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकणाऱ्या समर्थकांच्या सोयीसाठी, शपथविधी सोहळ्याचे केपीसीसी मुख्यालयातून थेट प्रक्षेपण केले जाईल. डी के शिवकुमार म्हणाले की, पक्षाला सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी सामावून घेणे शक्य होणार नाही.

त्यांच्यासोबत इतर मंत्रीही शपथ घेतील का, असे विचारले असता, डी के शिवकुमार म्हणाले की, हा निर्णय काँग्रेसच्या हायकमांडवर सोडला जाईल. “पक्षाची हायकमांड जो काही निर्णय घेईल, तो पूर्ण केला जाईल,” असे ही सांगितले.

या आठवड्याच्या सुरुवातीला, एस सिद्धरामय्या यांनी कर्नाटकची सूत्रे औपचारिकपणे डी. के. शिवकुमार यांच्याकडे सोपवली. काँग्रेस विधिमंडळ पक्षाने (सीएलपी) शिवकुमार यांची एकमताने नेतेपदी निवड केल्यानंतर लगेचच, काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, पक्ष कर्नाटक आणि राष्ट्रीय स्तरावर सिद्धरामय्या यांच्या अनुभवावर आणि नेतृत्वावर अवलंबून राहील.

बंगळूरच्या विधान सौध येथे झालेल्या सीएलपीच्या बैठकीत शिवकुमार यांच्या पदोन्नतीला औपचारिक स्वरूप देण्यात आले, जिथे २८ मे रोजी मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झालेल्या सिद्धरामय्या यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याचे नाव सुचवले.

या प्रस्तावाला पक्षाच्या आमदारांनी एकमताने पाठिंबा दिला, ज्यामुळे डी के शिवकुमार यांचा कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला. आपल्या निवडीनंतर, डी के शिवकुमार यांनी लोक भवन येथे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेतली आणि राज्यात नवीन सरकार स्थापन करण्याचा औपचारिक दावा केला.

About Editor

Check Also

दिल्ली-मुंबईवर हल्ला करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानच्या आयएसआय़च्या दहशतवाद्यांना अटक दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची कारवाई

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) आणि मुंबई अंडरवर्ल्डमधील घटकांचा समावेश असलेल्या पाकिस्तानस्थित नेटवर्कशी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *