मी शेलार यांच्यावर बोलत नाही. पण आज त्यांचं खास अभिनंदन आणि कौतुक करतो. की त्यांनी मतदार यादीतील घोळ आणि दुबार मतदार हे वाचून दाखवले. मग दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाची बाजू घेत आहेत. आणि बोगस मतदान झाले नाही अस म्हणत आहेत. त्यालाच एक प्रकारे शेलार यांनी देवेंद्र फडणवीस यांना पप्पू ठरवले असा उपरोधिक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावत पुन्हा म्हणाले की त्यामुळे मी त्यांचं पुन्हा एकदा शेलार यांचे कौतुक करतो. दुसरीकडे जर मतदार यादीतच घोळ असेल आणि सरकारमध्येच तुम्ही बसले आहात तर सरकार चालवण्यास तुम्ही नालायक आहात. आणि निवडणूक आयोगावरती आम्ही काही प्रश्न विचारतोय परंतु उत्तर देते भाजपावाले अशी टीकाही यावेळी केली.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणुकीत १८ वर्षांवरील प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार आहे. मात्र निवडणूक आयोग १ जुलैलची मतदार यादी ग्राह्य धरत असून १८ वर्षांवरील तरुण मतदान करु शकणार नाहीत. तरुण पिढी क्रांती घडवते याची भीती निवडणूक आयोग व आयोगाच्या मालकाला सतावत आहे, असा टोला शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा व निवडणूक आयोगाला लगावला. तसेच मतदार यादीतील घोळ दूर होत नाही तोपर्यंत मतदान घेऊ नये, असे आवाहनही राज्य निवडणूक आयोगाला केले आहे. तसेच बोगस मतदार, दुबार मतदार, शेतकऱ्यांची कर्जमाफी अशा विविध मुद्द्यावरुन ठाकरे यांनी भाजपासह निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला.
मातोश्री निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, एक जुलैनंतर ज्या मुला-मुलींचे वय वर्ष १८ पेक्षा अधिक झाले आहे. अशा तरुण मुलामुलींना मतदान करता येणार नाही, असं निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. आपण जगभर बघतोय की, अठरा वर्षानंतरचे तरुणच क्रांती करतात. मग त्या ‘जेन झी’ला निवडणूक आयोग मतदान का करू देत नाही? असा सवाल उपस्थित केला.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हे सरकार तरुण -तरुणा का घाबरत आहे हे पण कळले पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या मतदार यादीतील जोपर्यंत घोळ दूर होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या नाही पाहिजे. निवडणूक घेऊ नका, यासाठी निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवणार आहे. तसेच कोर्टात न्याय मागण्याचा केविलवाणा प्रयत्न करणार आहोत, असेही यावेळी सांगितले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती यांनी म्हटले की, महाराष्ट्राच्या मतदार यादीत ४५ लाख मतदार हे घुसले आहेत. निवडणूक आयोग हे करपट प्रॅक्टिस आहे, ते कोणाची नोकरी करत आहे हे समजले पाहिजे, अशी टीकाही यावेळी निवडणूक आयोगावर करत म्हणाले की, निवडणूक आयोग हि भुताटकी आहे. एका एका घरात ३० ते ४० माणसे आहेत. त्यामुळे त्या मतदाराने आपल्या घरात आणखी कोण राहतंय? आणखी कोण आपल्या घरातून मतदान करत आहे. ते पण मतदारानी तपासावे अशी मी त्यांना विनंती करतो. आणि जे तरुण अठरा वर्षाच्या आहेत त्यांनी आमच्या शाखामध्ये यावं आणि आपले मत नोंदवावे असे आवाहनही यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकार शेतकरी कर्जमाफी का करत नाही. पिक विम्यातून शेतकऱ्यांची थट्टा सुरु आहे. सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत देऊ असे म्हटलं होते. पण ती मदत किती दिली आहे? याची आम्ही चौकशी करणार आहे. आता खरिपाचा हंगाम तरी गेला आहे. मात्र रब्बी हंगामासाठी जर जमीनच वाहून गेली आहे तर शेतकऱ्याला कर्ज कुठून मिळणार आहे? आणि मला वाटत की, राज्याकडून केंद्राला कोणताही प्रस्ताव गेला नाही. केंद्रीय पथक पाहणीसाठी राज्यात येणार आहे, हे पथक दोन ते तीन दिवस पाहणी करणार आहे. संपूर्ण मराठवाडा अतिवृष्टीमुळे वाहून गेला आहे. आणि दोन-तीन दिवसात केंद्रीय पथक कशी पाहणी करणार? आणि कोणती पाहणी करणार? असा सवालही यावेळी उपस्थित केला.
आम्ही शेतकरी यांच्या पाठीशी
शेवटी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जुनमधे कर्जमाफी होणार, मग शेतकरी यांनी आता कर्जाचे हफ्ते भरायचाचे की नाही? तसेच मुख्यमंत्री म्हणतात की आता कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा होईल आणि जूनमध्ये केले तर फायदा होणार नाही. मग मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी केले होते. तो डेटा… ती माहिती… त्या सिस्टीम मध्ये आहे. त्यामुळे त्या सिस्टम प्रमाणे सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी करत पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की. मुख्यमंत्री म्हणतात की आता कर्जमाफी केली तर बँकांना फायदा होईल हे गणित त्यांनी कसं काय लावलं? याचा खुलासा फडणवीस यांनी करावा. शेतकरी जगाचा पोशिंदा असून शेतकऱ्याच्या पाठिशी आम्ही उभे आहोत, असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.
Marathi e-Batmya