शिक्षण विभागाचा मोठा निर्णय: परिक्षा नाही- मुलांना पुढच्या वर्गात प्रवेश शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी

दिवसेंदिवस राज्यातील कोविड बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून आता लहान मुलांनाही याची लागण होत आहे. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनत आहे. तसेच ऑनलाईन शिक्षणाच्या पध्दतीतून राज्यातील १ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झालेला नसल्याने या विद्यार्थ्यांच्या परिक्षा न घेता त्यांना पुढच्या वर्गात पाठविण्याचा निर्णय आज शालेय शिक्षण विभागाने घेतल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरून दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत सदरचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरु झालेल्या शाळा बंद कराव्या लागल्या. तर काही भागात शाळाच सुरुच करता आल्या नाहीत. तरीही ऑनलाईन पध्दतीने शिक्षण सुरु ठेवण्यात आले होते. मात्र शाळा सुरु करूनही आणि ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवूनही विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण करता आला नाही. त्यामुळे परिक्षा न घेता १ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ९ वी आणि ११ वीतील विद्यार्थ्यांच्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र त्यांच्याबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे तुर्त त्यांच्या परिक्षा रद्द जरी करण्यात आलेल्या नसल्या तरी त्या परिक्षा होतील याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र त्याबाबतही लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

बंधपत्राचे उल्लंघन केले म्हणून कॉकरोच जनता पार्टीचे सौरव दास आणि आशुतोष रांका यांची तिहार तुरुंगात रवानगी विशेष न्यायदंडाधिकारी महेश कुमार मीना यांचे आदेश

‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना बुधवारी पाच दिवसांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *