Tag Archives: दत्तात्रय भरणे

दत्तात्रय भरणे यांचे आश्वासन, ओबीसींप्रमाणेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही मिळणार शुल्क सवलत चारही कृषी विद्यापीठांतील पात्र विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

“शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, ही शासनाची भूमिका आहे. मराठा समाजातील पात्र विद्यार्थ्यांनाही ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे,” असे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. दत्तात्रय भरणे पुढे म्हणाले की, …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्यासह पशुधनाच्या चाऱ्याचे सूक्ष्म नियोजन यावर भर तंत्रज्ञानाधारित दुष्काळी मदतीचे नियोजन याला प्राधान्य, केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक

राज्यात उद्भवलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पुढील सहा ते आठ महिने अधिक आधार देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासाठी रोजगारनिर्मिती, गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचविणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पशुधनासाठी चारा-पाणी उपलब्ध करून देण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासोबतच्या …

Read More »

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून राजापूर, बुरलेवाडी येथील दुष्काळ परिस्थितीची पाहणी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध

राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगोला तालुक्यातील राजापूर व बुरलेवाडी येथे दुष्काळसदृश्य परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून खरीप पिकांची सद्यस्थिती आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पावसाचे प्रमाण, पिकांची वाढ, पाणी उपलब्धता आणि शेतीच्या नुकसानीबाबत माहिती जाणून घेतली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय …

Read More »

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती, महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणीस राज्यभरातून महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणीसाठी ३७ लाखांहून अधिक महिलांचे अर्ज प्राप्त

महिला शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतील योगदानाची अधिकृत ओळख मिळावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणीसाठी राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज ७ ऑक्टोबर पर्यंत राज्यभरातून तब्बल ३७ लाख ९३ हजार ०५१ अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यातील प्रत्येक पात्र महिला शेतकरी या उपक्रमाशी जोडली जावी, यासाठी कृषी विभागामार्फत सातत्याने प्रयत्न …

Read More »

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची स्पष्टोक्ती, महाराष्ट्रातील रबी हंगामासाठी केंद्राकडे विशेष उपाययोजनांची मागणी यांत्रिकीकरण व सूक्ष्म सिंचनासाठी प्रत्येकी ५०० कोटींचा निधी; १० लाख रबी ज्वारी बीज मिनी किट्सची मागणी

महाराष्ट्रातील विविध भागांत यंदा कमी व असमान पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि आगामी रबी हंगामातील संभाव्य अडचणी लक्षात घेऊन राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे केली. राष्ट्रीय कृषि संमेलन –रब्बी अभियान २०२६ च्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »

दत्तात्रय भरणे यांचे आश्वासन, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीकडे शासन अतिशय गांभीर्याने पाहत आहे. मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांनी आजपासूनच पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, येत्या तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भातील पहिली अधिसूचना निघणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. कोणत्याही परिस्थितीत शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. झालेल्या नुकसानीसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. शेतकऱ्यांना जास्तीत …

Read More »

कर्नाटक पॅटर्नच्या धर्तीवर अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थापन केली दुष्काळी मंत्रिमंडळ समिती शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना काढणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मान्सून पाऊसाचा कालवधी संपण्याचा कालावधी अधिकृतरित्या ५ ऑक्टोंबर रोजी संपणार आहे. मात्र तत्पूर्वीच मान्सूनच्या पावसाने राज्यातील अनेक भागात उघडीप दिली. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या हातची पिके जाण्याची शक्यता निर्माण झाली. तर काही ठिकाणी पिके हातची गेल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे. कर्नाटकातही अशीच परिस्थिती …

Read More »

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील पिकांच्या स्थितीची करणार प्रत्यक्ष पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद

राज्यातील काही भागांत पावसाने ओढ दिल्याने शेतीपिकांवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती महसूल विभागातील विविध भागांना भेटी देऊन ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करणार असून, शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. तसेच, या …

Read More »

महिला शेतकऱ्यांना आता मिळणार अधिकृत ओळख; महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत कृषी विभागाचा महत्त्वपूर्ण उपक्रम

“शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र अनेक वेळा शेतीत प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळत नाही. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमामुळे ही परिस्थिती बदलणार असून, महिलांना अधिकृत ओळख, शासकीय योजनांचा लाभ, कृषी कर्ज, विमा, कृषी निविष्ठा आणि विस्तार सेवांचा लाभ अधिक सुलभपणे मिळणार आहे. …

Read More »

दत्तात्रय भरणे यांचे आवाहन, भारतीय डाळिंबाला जागतिक बाजारपेठेत नवी ओळख मिळण्यासाठी एकत्र काम करावे पुण्यात आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषद–२०२६

भारतीय डाळिंबाला जागतिक बाजारपेठेत उच्च दर्जाचे, सुरक्षित आणि विश्वासार्ह उत्पादन म्हणून नवी ओळख मिळवून देण्यासाठी केवळ उत्पादन वाढविणे पुरेसे नाही. गुणवत्ता, उत्पादकता, निर्यात, प्रक्रिया आणि मूल्यवर्धन यावरही भर देत शेतकरी, वैज्ञानिक, उद्योजक आणि शासनाने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. यशदा, पुणे येथे …

Read More »