Tag Archives: अतिवृष्टी

हर्षवर्धन सपकाळ यांचा यांची टीका, हाहाकार माजला असला तरी केंद्राला अहवालही पाठवला नाही अन्यथा मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती, दसरा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभर वर्ष हा सुवर्णयोग एकाच दिवशी आलेला आहे. रा. स्व. संघाला १०० वर्षे होत असताना आलेला हा योग संघाने समजून घ्यायला हवा. गांधी पुतळ्याच्या समोर फक्त मानवंदना देऊन चालणारा नाही तर नथुरामचा धिक्कार करून बुरसटलेले विचार, मनुस्मृती व बंच ऑफ थॉट …

Read More »

जयंत पाटील यांचे राज्यपालांना पत्र, तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा… राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांची राज्यपालांना पत्र लिहित केली विनंती

राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीवर चर्चा व्हावी म्हणून तीन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवा असे विनंती करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना लिहिले आहे. जयंत पाटील राज्यपालांना पाठविलेल्या पत्रात म्हणाले की, यावर्षी राज्यभरात पावसाने थैमान घातले आहे. मागील आठवड्याभरापासून …

Read More »

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शासन प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्परः फोन नंबर जाहिर नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शासकीय सूचनांचे पालन करण्याचे प्रशासनाचे आवाहन

भारतीय हवामान विभागाकडून (IMD) मिळालेल्या माहितीनुसार, २७ ते ३० सप्टेंबर २०२५ या काळात राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. महसूल आणि वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शहरी भागात पूर …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, शेतकऱ्यांना भरीव प्रमाणात नुकसान भरपाई देणार उत्तर महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना भरीव प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात येईल, त्यासाठी नियमांची अडचण येऊ दिली जाणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. जळगाव विमानतळावर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधतांना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, …

Read More »

रमेश चेन्नीथला यांचा सवाल, आगामी दौऱ्यात तरी मोदी नुकसान ग्रस्त भागात जाणार का? महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत?

महाराष्ट्रावर प्रचंड मोठे नैसर्गिक संकट ओढवले आहे, ५० लाख हेक्टर पेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाले आहे, १०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला तर शेकडो जनावरे दगावली आहेत. राज्यात अत्यंत विदारक चित्र असताना महायुती सरकार त्याकडे गांभिर्याने पहात नाही. महाराष्ट्र संकटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारमधील एकही मंत्री महाराष्ट्रातील …

Read More »

उद्धव ठाकरे यांचे टीकास्त्र, भाजपाला सरकार चालवता येत नाही हा डोळस विश्वास पूरग्रस्तांसाठी हेक्टरी ५० हजार रुपये द्यावे, पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांना ५० हजार कोटी रूपये द्यावेत

राज्यातील भाजपाला प्रशासन कळत नाही, त्यांना सरकार चालविता येत नाही. जे काही राज्यात सुरु आहे ते दिल्लीच्या बळावर सुरु आहे. त्यामुळे माझा अंध नव्ह तर डोळस विश्वास असल्याची टीका शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या गंगेमध्ये डुबकी मारल्यानंतर सर्व पापे धुतली जातात, …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका, आग लगे बस्ती में, हम हमारे मस्ती में… नवरात्रीच्या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्याने केला डान्स

राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्याने धरण नद्या नाले ओसंडून वाहत आहे. शेतात पाणी घरा दारात पाणी संसार वाहुन गेले. शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी, अशी परिस्थिती धाराशिव जिल्ह्यात असताना तेथील जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार नवरात्रीच्या कार्यक्रमात नाचत आहेत, प्रशासनाला आणि राजकर्त्यांना याचं गांभिर्य नाही अशी घणाघाती …

Read More »

मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला पूरग्रस्त भागातील पशुधन हानीचा व सुरक्षिततेचा आढावा पूरग्रस्त भागात फिरती पशुवैद्यकीय पथके सक्रिय ठेवून तात्काळ सेवा द्या

राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे पशुधनाच्या झालेल्या हानीचा व त्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज आढावा घेतला. अतिवृष्टी व पुरामुळे मृत जनावरांच्या मालकांना योग्य ती शासकीय मदत मिळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने महसूल विभागाशी समन्वय साधावा, असे निर्देश पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. तसेच अतिवृष्टी व पूरग्रस्त भागात जनावरांसाठी …

Read More »

महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे एकूण ३१ लाख ६५ हजार शेतकरी बाधित २ हजार २१५ कोटींचा निधी मंजूर

१७ ते २६ सप्टेंबर या कालावधीतील भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात अतिवृष्टी झाली. या कालावधीत जवळपास ३१ लाख ६५ हजार शेतकरी बाधित झाले. नेमक्या याच कालावधीत अतिवृष्टीबरोबरच मराठवाड्यातील बहुतांष भागात पूरस्थिती निर्माण झाली. तसेच सोलापूरातही पुर परिस्थिती निर्माण झाली. या ३१ लाख ६५ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम जवळपास …

Read More »

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेती, घर व पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना शासनातर्फे लवकरच मदत दिली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कोर्टी (ता. करमाळा), मुंगशी (ता. माढा), लांबोटी (ता. मोहोळ) या भागांतील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी उपमुख्यमंत्री पवार यांनी केली. यावेळी आमदार नारायण आबा पाटील, अपर जिल्हाधिकारी …

Read More »