५ जून रोजी जगभरात प्रदर्शित होणाऱ्या ‘ठग लाईफ’ या तामिळ चित्रपटाचे प्रदर्शन कर्नाटकात होणार नाही, कारण कर्नाटक उच्च न्यायालयाने या संदर्भात सूचना केल्यानंतरही अभिनेता कमल हासन यांनी ‘कन्नड ही तामिळ भाषेतून जन्मली आहे’ या वादग्रस्त विधानाबद्दल माफी मागितली नाही. कन्नड समर्थक संघटना आणि कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स (केएफसीसी) यांच्या …
Read More »अभिनेता आमिर खान म्हणाला, अभिनय जितका प्रामाणिकपणे कराल, तितके ते उत्तम होईल वेव्हस कार्यक्रमात अभिनय विषयावर आपली भूमिका मांडली
एआय तंत्रज्ञानामुळे चित्रपटसृष्टीत मोठा बदल घडत आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे अभिनेत्याशिवाय दृश्य चित्रित करणे शक्य झाले आहे. चित्रपटसृष्टीत काम करताना तुमचे काम तुम्ही जितके प्रामाणिकपणे कराल, तितके ते उत्तम होईल असल्याचे सांगून ‘अभिनयाची कला’ या विषयावरील त्यांच्या अतिशय सहजसोप्या आणि उपयुक्त सल्ल्यांनी अभिनेता आमिर खान यांनी वेव्हज २०२५ मध्ये अनेकांची मने …
Read More »सैफ अली खान प्रकरणी पोलिसांचा आरोपीच्या जामीन अर्जाला विरोध घटनास्थळी सापडलेल्या तुकड्य़ासह अन्य चाकुच्या तुकड्यात साम्य
अभिनेता सैफ अली खानवर वांद्रे येथील घरी झालेल्या हल्ल्यामध्ये त्याच्या मणक्यात अडकलेला चाकूचा तुकडा, घटनास्थळी सापडलेला एक तुकडा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामकडून हस्तगत केलेल्या शस्त्राशी जुळत आहेत. हे तीन तुकडे अभिनेत्यावर हल्ला करण्यासाठी वापरलेल्या शस्त्राचा भाग होते, असे पोलिसांनी शुक्रवारी सत्र न्यायालयात सांगितले. तसेच पोलिसांनी जामीन अर्जाला विरोध केला. तिन्ही तुकडे मुंबईतील कलिना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये सीए (रासायनिक विश्लेषण) तपासणीसाठी पाठवण्यात आले. एफएसएल …
Read More »जिओ स्टुडिओज् प्रस्तुत “झापुक झुपूक” सिनेमा २५ एप्रिलपासून चित्रपटगृहात उत्कृष्ट कलाकारांची दमदार फळी, पोस्टर पाहून चित्रपटाची उत्सुकता शिगेला !
जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे, निर्माती सौ. बेला केदार शिंदे ,केदार शिंदे दिग्दर्शित “झापुक झुपूक” या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दमदार टिझर आणि पोस्टर नंतर आता आणखी एक नवा धमाकेदार पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. फॅमिली एंटरटेनमेंटचा जबरदस्त तडका असलेल्या “झापुक झुपूक” या चित्रपटाच्या …
Read More »अभिनेता अल्लू अर्जूनची चिकडपल्ली पोलिसांकडून ४ तास चौकशी जामीन मिळाल्यानंतर पहिल्यांदाच पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले
तेलगू अभिनेता अल्लू अर्जुनची या महिन्याच्या सुरुवातीला रिलीज झालेल्या ‘पुष्पा २: द राइज’ या चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान चेंगराचेंगरीत एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी सुमारे चार तास चौकशी केली. चौकशीदरम्यान, जामिनावर बाहेर असलेल्या अर्जुनने सांगितले की, त्याला दुसऱ्या दिवशी महिलेच्या मृत्यूची माहिती मिळाली, असे सूत्रांनी सांगितले. अल्लू अर्जुन सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास …
Read More »सचिन सावंत यांचा सवाल, सुशांतसिंह राजपूत…सीबीआय मात्र अद्याप गप्पच का? सुशांतसिंह प्रकरणी भाजपाकडून मविआ, मुंबई पोलीसांची बदनामी व सुशांतचे कुटुंब वेठीस
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासाला आज चार वर्ष झाली परंतु यासंदर्भातील तपास करणाऱ्या सीबीआयने आपला अहवाल अद्याप जाहीर केलेला नाही. भाजपाने सुशांतच्या आत्महत्येला हत्येचे रुप देऊन आपला कुटील राजकीय हेतू साधण्यासाठी वापर केला. मविआ सरकार असताना महाराष्ट्रात सीबीआय तपासाला परवानगी नसल्याने बिहारमध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीने गुन्हा नोंदवून सीबीआयकडे तपास वर्ग …
Read More »अभिनेत्री “सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहिर इक्बाल” नांदा सौख्यभरे नोंदणी पध्दतीने विवाह सोहळा संपन्न
मागील काही दिवसांपासून अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांची कन्या आणि चित्रपट अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहिर इक्बाल यांच्या लग्नाच्या चर्चेने समाज माध्यमात विविध पध्दतीने चर्चा होत होत्या. तर हिंदूत्ववाद्यांकडून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहिर इक्बाल यांच्या विरोधात ट्रोल मोहिम राबविली जात होती. मात्र या ट्रोल वाल्यांना जराही भीक न …
Read More »अभिनेते प्याराली उर्फ राज नयानी यांचा इशारा, चित्रा वाघ यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा…
मी एक चारित्र्यवान कलावंत आहे आणि एका कलावंताचा अपमान केला म्हणून भाजपा नेता चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी अन्यथा मी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करेन ” अशी भूमिका अभिनेते प्याराली उर्फ राज नयानी यांनी भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी केलेल्या पोर्न स्टारच्या आरोपावरून इशारा दिला. आज समाजमाध्यमा वर …
Read More »सलमान खानच्या घरासमोरील गोळीबार घटनेची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली
पहाटेच्या वेळी सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलसी या घरासमोर दोन अज्ञात व्यक्तींनी बाईकवर येत गोळीबार केल्याची केल्याची घटना घडली. या गोळीबारात चार राऊंड झाडण्यात आल्या. तसेच हा गोळीबार सलमान खानसाठीच करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर या घटनेची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने रविवारी बॉलिवूड अभिनेता …
Read More »यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहिर
गतवर्षी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करत त्या सोहळ्याचे आयोजन नवी मुंबईतील सिडकोच्या मैदानावर भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात उष्माघाताने जवळपास १३ नागरिकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यापार्श्वभूमीवर यावर्षीचा मराठी-हिंदी चित्रपटात चरित्र आणि विनोदी भूमिका साकारणारे अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार …
Read More »
Marathi e-Batmya