Tag Archives: कुंभमेळा

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, कुंभमेळ्याच्या नावाखाली फडणवीस सरकारचा मोठा भ्रष्टाचार ३६ हजार कोटींच्या निधीत ५० टक्क्यांची मलई, भाजपा-महायुती सरकारने भ्रष्टाचारासाठी पवित्र कुंभमेळाही सोडला नाही

नाशिकमध्ये होत असलेल्या कुंभमेळ्यासाठी महायुती सरकारने ३६ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून नाशिकमध्ये विकासकामे केली जात असल्याचा सरकारचा दावा आहे पण प्रत्यक्षात या निधीतून जास्तीत जास्ती मलई खाण्याचे काम होत आहे. २२ कोटी रुपये मंडपावर खर्च केले जात आहेत, ३ कोटी रुपये हेलिपॅडवर खर्च केला जात …

Read More »

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला वैविध्यपूर्ण वारसा संच भेट

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या भव्य पर्वाचा शुभारंभ ठरणाऱ्या ३१ ऑक्टोबरच्या ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अन्य मंत्री आणि अधिकारी – पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते. राष्ट्रपती भवन येथे झालेल्या या भेटीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रपती …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, कुंभमेळा विकासकामांमुळे नाशिक-त्र्यंबकेश्वरचा चेहरा-मोहरा बदलणार विविध विकासकामांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणी

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेली विविध विकासकामे वेगाने पूर्णत्वाकडे जात असून, या कामांमुळे नाशिक व त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलणार आहे. पुढील २५ ते ३० वर्षांचा विचार करून आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच भाविक, पर्यटक आणि नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सुरू असलेली सर्व कामे निर्धारित वेळेत …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, सेवा संकल्प अभियान नसून ‘मेवा संकल्प अभियाना’चा शेवटचा अंक शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई जाहीर करा; अन्यथा अमित शहांचा महाराष्ट्र दौरा म्हणजे केवळ भ्रष्टाचाराच्या हिशोबाचा दौरा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा हा ‘सेवा संकल्प अभियान’ नसून ‘मेवा संकल्प अभियाना’चा शेवटचा अंक खेळण्यासाठी आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, देशाची राजधानी दिल्ली असली …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, कुंभमेळ्यासाठी नाशिक रिंगरोड भूसंपादन प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा शेतकऱ्यांच्यावर प्रकल्प लादू नका, जबरदस्ती भूसंपादन करू नका

नाशिक जिल्ह्यात येऊ घातलेल्या कुंभमेळ्यासाठी रिंगरोड प्रकल्प बनवण्यात येत आहे. पण या प्रकल्पासाठी करण्यात येत असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत गंभीर अनियमितता, अलायन्मेंट बदल, शेतकऱ्यांवर दबाव आणि महिलांशी गैरवर्तन झाल्याचे आरोप अत्यंत गंभीर आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ नेते …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, कुंभमेळा कामांना अधिक गती देणार मुख्यमंत्र्यांनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कामे समाधानकारकरितीने होत असून आगामी काळात या कामांना अधिक गती देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महंत …

Read More »

नाशिक विमानतळावरील नवीन धावपट्टी आणि विमानसेवा सिंहस्थ कुंभमेळा २०२७ पूर्वी करून द्या मंत्री छगन भुजबळ यांचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

नाशिक विमानतळावर उभारण्यात येत असलेली ३००० x ४५ मीटर लांबीची नवीन धावपट्टी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ पूर्वी कार्यान्वित करून नागरी विमान सेवेसाठी परवानगी देऊन सुरू करण्यात यावी अशी मागणी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, जग स्तिमित होईल, असाच कुंभमेळा होणार नाशिक येथे कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठक, कुंभमेळ्याचे मुहुर्त

कुंभमेळा सुरक्षित, निर्मळ आणि पवित्र वातावरणात होण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात येईल. कुंभमेळा भारतीय सनातन संस्कृतीचे प्रतीक असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष याकडे आहे. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने जग स्तिमित होईल असे भव्य दिव्य …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, नाशिकला नवा पालकमंत्री देणार नाशिकच्या विकासालाही चालना देण्याचा व्यक्त केला निर्धार

मागील अनेक दिवसांपासून नाशिकच्या पालकमंत्र्याचा वाद भाजपा आणि शिंदे गटाच्या शिवसेनेसोबत सुरु आहे. शिवसेनेचे दादाजी भुसे यांनी नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा केला आहे. तर नाशिकमधील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री पद गिरिष महाजन यांच्याकडे देण्यात आले. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकला नवा पालकमंत्री देणार असल्याची घोषणा करत शिंदे गटाच्या शिवसेनेसोबतचा …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, फक्त धनंजय मुंडेच नाही तर मंत्रिमंडळात ६५ टक्के मंत्र्यांवर गुन्हे… कुंभमेळ्यातील भाविकांच्या मृत्यूंना जबाबदार कोण? मोहन भागवत मोदी-योगींचा राजीनामा का मागत नाहीत?

अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर दररोज गंभीर स्वरुपाचे आरोप होत आहेत पण राज्याच्या मंत्रिमंडळात फक्त धनंजय मुंडे किंवा संजय राठोडच नाही तर तब्बल ६५ टक्के मंत्र्यांवर विविध प्रकारचे गुन्हे आहेत, भारतीय जनता पक्ष स्वःताला पार्टी विथ डिफरन्स मानते तर त्यांनी या सर्व दागी, गुन्हे दाखल असलेल्या कलंकीत …

Read More »