नेपाळ येथील महापुरामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेले पर्यटक यांच्या मदतीसाठी विविध पातळीवर शासकीय यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करत आहेत. सर्वजण सुरक्षितपणे त्यांच्या गावी परत पोहोचण्यासाठी सतर्कतेने योग्य नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सागा येथून ४१ जण आज परतले असून १०६ जण नागपूरला उद्या पहाटे …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी नवे तंत्रज्ञान आणि संशोधनाचा उपयोग आवश्यक उत्पादनखर्च कमी करून उत्पादकता वाढविण्यात कृषी महाविद्यालयांची महत्वाची भूमिका
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. मात्र शेतकऱ्याला कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी नव्या तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्था उभी करावी लागेल. त्यासाठी कृषी क्षेत्रातील आव्हाने लक्षात घेऊन आधुनिकीकरण, नवे तंत्रज्ञान आणि संशोधनाचा वापर करून उत्पादनखर्च कमी करीत उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी महाविद्यालयांनी महत्त्वाची भूमिका बजवावी, असे आवाहन …
Read More »गिरीश महाजन यांची माहिती, नेपाळमधील पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांसाठी केंद्र सरकारशी संपर्कात आतापर्यंत चार पर्यटकांशी संपर्क, नेपाळमध्ये गेलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्याच्या प्रशासनाला सूचना
नेपाळ-तिबेट परिसरातील भूकंप, पूर आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर तेथे गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची माहिती संकलित करण्यात येत आहे. आतापर्यंत चार पर्यटकांशी संपर्क झाला असून ते सुखरूप आहेत. केंद्र सरकारशी सातत्याने संपर्क सुरू असून यंत्रणा 24 तास सतर्क असल्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. मंत्री गिरीश महाजन म्हणाले, प्रशासनाकडे 80 लोकांची माहिती …
Read More »गिरीश महाजन यांचे आवाहन, पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची राज्य आपत्त्कालीन नियंत्रण कक्षाला भेट
राज्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागांत पाऊस सुरू आहे. विशेषतः मुंबईत चांगला पाऊस होत असून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर …
Read More »गिरिश महाजन यांची माहिती, ‘भारत फोरकास्ट सिस्टम’चा वापर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेसह, महाराष्ट्राची आपत्ती व्यवस्थापन क्षमतेत मोठी झेप
अत्याधुनिक हवामान अंदाज प्रणाली ‘भारत फोरकास्ट सिस्टम’चा वापर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले असून हवामान पूर्वसूचना, स्थानिक पातळीवरील तयारी आणि समन्वित प्रतिसाद यामध्ये मोठी सुधारणा होईल. यासाठी भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) समवेत करार महाराष्ट्राच्या आपत्ती व्यवस्थापन क्षमतेला अधिक बळकट करणारा महत्त्वाचा टप्पा आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, भांडवली बाजारातील ‘ बॉण्ड’च्या माध्यमातून विकासाला निधीचे बळ नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये नाशिक महापालिकेच्या ग्रीन बॉण्डचे लिस्टिंग
महानगरपालिकांना आपल्या विविध विकास कामांसाठी भांडवली बाजारात बॉण्ड जारी करून निधी उभारता येतो. नाशिक महापालिकेप्रमाणे ‘ इनोव्हेटिव्ह फंड’ निर्माण करून विकासाला निश्चितच निधीचे बळ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. बीकेसी येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये नाशिक महापालिकेच्या ग्रीन बॉण्डचे लिस्टिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ‘ रिंगिंग बेल’ वाजवून करण्यात आले. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश …
Read More »गिरीश महाजन यांचे आदेश, अतिवृष्टी, पुराच्या अनुषंगाने यंत्रणांनी अधिक सतर्क रहावे मुंबईसह राज्यातील परिस्थितीचा घेतला आढावा
भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असून राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षात उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबई शहर आणि परिसरासह राज्यातील परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण …
Read More »गिरीश महाजन यांची माहिती, उत्तरकाशीमधील अडकलेले पर्यटक सुरक्षित आज परतणार फक्त एका महिला पर्यटक कृतिका जैन यांच्याशी अद्याप संपर्क झालेला नाही
उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली आणि हर्षिल परिसरात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या भूस्खलन व पुरस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. या पर्यटकांना जॉली ग्रँड विमानतळ आणि मताली कॅम्प येथे आणण्यात आले असून ते सुखरूप आहेत. उर्वरित एक पर्यटक श्रीमती कृतिका जैन यांचा शोध अद्याप सुरू असून त्यासाठी संबंधित …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, कायमस्वरूपी सिंचन प्रकल्प पूर्ण करा जलसंपदा विभागांतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध योजना आणि उपक्रमांची अंमलबजावणी करीत आहे. शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सिंचन प्रकल्पांची कामे सुरू आहेत. काही प्रकल्पांच्या पुर्णत्वासाठी १८ वर्षानंतर निविदा प्रक्रिया जारी करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाने रखडलेले प्रकल्प पूर्ण करीत शेतीला कायमस्वरूपी सिंचन उपलब्ध करून देत शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक भरभराट आणावी, …
Read More »पुण्यात रेव्ह पार्टीः एकनाथ खडसे यांचा जावई प्रांजल खेवलकर यांना अटक पहाटे ३.३० वाजता पुणे पोलिसांची कारवाई, काही महिला आणि पुरुषांना अटक
मागील काही वर्षात राज्यात ड्रग्ज आणि अमली पदार्थाचा वापर राज्यातील तरूणाईंमध्ये वाढल्याच्या चर्चा वाढीस लागल्यानंतर आता हनी ट्रॅपचे प्रकारही वाढत असल्याचा मुद्दा नुकताच झालेल्या पावसाळी अधिवेशात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी उपस्थित केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्याकडून ही याच प्रकारचे आरोप भाजपाचे नेते तथा …
Read More »
Marathi e-Batmya