Tag Archives: देवेंद्र फडणवीस

पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी नुकसानभरपाईच्या धोरणास मान्यता जवळच्या वारसांना नुकसान भरपाई देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

पोलीस कोठडीतील व्यक्तींच्या मृत्यू प्रकरणात त्यांच्या जवळच्या वारसदारांना नुकसानभरपाई देण्याबाबतच्या धोरणास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या धोरणानुसार पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या मारहाण, अत्याचार किंवा दबावामुळे  मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यास जवळच्या वारसदारास ५ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. अशा व्यक्तीस शारीरिक किंवा …

Read More »

पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना साहसी कामगिरीसाठी मुख्यमंत्री शौर्य पदक मनोबल उंचावण्यासाठीचा सन्मान, दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला होणार घोषणा

राज्याच्या पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना साहसी कामगिरीसाठी ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ देण्यात येणार आहे. कर्तव्य बजावताना जोखीम पत्करून केलेल्या कामगिरीसाठी मुख्यमंत्री शौर्य पदक विजेत्यांना रोख पन्नास हजार रुपये, पदक तसेच प्रशस्तीपत्र मिळणार आहे. या सन्मान योजनेस मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. दरवर्षी महाराष्ट्र दिन १ …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, किमान ७० किलोमीटर मेट्रो मार्गिकांच्या पूर्णत्वातून २०२७ हे ‘मेट्रो वर्ष’ मुंबईच्या दळणवळणाला गती देण्यासाठी मेट्रो आणि उन्नत मार्गिकांच्या कामांना वेग

२०२७ हे ‘मेट्रो वर्ष’ ठरवून यंदाच्या प्रलंबित कामांसह पुढील वर्षी किमान ७० किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका पूर्ण कराव्यात. डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणाऱ्या ३६ किलोमीटर मेट्रो मार्गिकांची व्याप्ती ५० किलोमीटरपर्यंत नेण्यासाठी कामांना गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पायाभूत सुविधांची कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रकल्पांवरील किमान …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, डिजिटल युगात मराठीला ज्ञानभाषा करणार मराठी ही केवळ संवाद आणि भाषा नव्हे, तर संस्कृती-इतिहासाची साक्षीदार

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे. विपुल शब्दसंपदा, समृद्ध साहित्यपरंपरा आणि विविध बोलीभाषांचा वारसा लाभलेल्या मराठीला २१ व्या शतकात डिजिटल आणि ज्ञानभाषा म्हणून अधिक सक्षम करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठीचा दैनंदिन व्यवहारातील वापर …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, शिवाजी पार्कवर तरुणाईचा प्रचंड असंतोष, सरकारविरोधातील आवाज दडपण्यासाठीच खोटे गुन्हे तरुणाईने उपस्थित केलेल्या मुळ प्रश्नांना भाजपाने उत्तर द्यावे, हिंदू-मुस्लीम व भारत-पाकिस्तानचे तुणतुणे बंद करा

केंद्र व राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार, निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभाराविरोधात तरुणाईमध्ये प्रचंड असंतोष आहे. शिवाजी पार्कवरील आंदोलनात या असंतोषाला वाचा फोडण्याचे काम करण्यात आले आहे, परंतु भाजपाच्या मोदी सरकार विरोधातील हा असंतोष दडपण्यासाठी सरकारने त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. भाजपाने कितीही गुन्हे दाखल केले तरीही ही तरुणाई आता मागे …

Read More »

शरद पवार यांचे आश्वासन, दुष्काळी परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार राज्यावर ओढवलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या दौऱ्याला सुरुवात

राज्यावर ओढवलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आजपासून पुणे जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा सुरू केला. बारामती, पुरंदर आणि दौंड या तालुक्यांमध्ये ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत. पुरंदर तालुक्यातील परिंचे गावात शरद पवार यांनी या दौऱ्यात राज्य …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न ! दुष्काळी परिस्थिती पाहून ट्रिगर-वनमध्ये न आलेल्या तालुक्यांचाही समावेश करणार

पंचनामे लवकर पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खिशात काहीतरी मदत गेली पाहिजे, असा सरकारचा विचार असून कॅबिनेट उपसमितीचीही त्याबाबत शिफारस असल्याचे महसूल मंत्री व दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,” राज्यातील दुष्काळी परिस्थितीत ट्रिगर-वनमध्ये न आलेल्या मात्र प्रत्यक्षात दुष्काळाची स्थिती असलेल्या …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची आशा, तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल स्टार्टअपची संख्या आणि क्रियान्वयनमध्ये महाराष्ट्र देशाची राजधान

वित्त, उद्योग, उद्योजकता आणि तंत्रज्ञान क्षेत्रात देशाला नेतृत्व देणारा महाराष्ट्र आता स्टार्टअपची संख्या आणि  त्याच्या क्रियान्वयन  या दोन्ही बाबतींत भारताची स्टार्टअप राजधानी ठरला आहे. हे सामर्थ्य आणि तरुणांचे  संशोधन महाराष्ट्राला नक्कीच भविष्यात  जगाचे इनोवेशन हब बनवेल,  असा आशावाद  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. एनसीपीए येथील जमशेद भाभा सभागृहात गेट्स …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे घेण्यात आले महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पडली पार

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचा आकृतीबंध मंजूर, सूर्या प्रकल्पग्रस्तांना ५६ वर्षानंतर मिळणार न्याय, नागपूर-म्हाडाला परवडणाऱ्या घरांसाठी मौजे बेला येथील शासकीय जमीन, वांद्रे येथील नॅशनल सोसायटी फॉर क्लिन सिटीजच्या जमीन भाडेपट्टयाच्या नुतनीकरणास मान्यता, कोल्हापूर सर्किट बेंचकरिता ४५९ पदांच्या निर्मितीस मान्यता, वाळूज येथे दिवाणी न्यायालय, १६ पदांच्या …

Read More »

महाराष्ट्रातील माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत दहा टक्के समांतर आरक्षण शासकीय, निमशासकीय गटक गणवेशधारी सेवांमध्ये भरतीचे धोरण निश्चित

महाराष्ट्रातील माजी अग्निवीरांना शासनाच्या गट-क गणवेशधारी सेवांच्या भरतीत दहा टक्के समांतर आरक्षण देण्याचा, तसेच माजी अग्निविरांना शासकीय, निमशासकीय सेवेत दाखल करून घेण्यासाठी धोरण निश्चित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. केंद्र शासनाने भारतीय सशस्त्र सेनेच्या – भूदल, नौदल आणि वायुदल यांच्याकरिता …

Read More »