राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या इशाऱ्यावरच काम करतात. दिल्लीकरांनी सांगितल्याशिवाय हे एकही निर्णय घेऊ शकत नाहीत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीचे हस्तक असून त्यांचा एक पाय कायम दिल्लीतच असतो, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मुख्यमंत्री …
Read More »भरत गोगावले यांनी केले स्पष्ट, सूत्र सांगणार आणि आम्ही आशेवर…विचारतोच मुख्यमंत्र्यांना राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरून भरत गोगावले यांनी भूमिका
राज्यात महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार येऊन एक वर्ष झालं, तरी अद्याप या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं सांगितलं जात आहे. परंतु त्याबद्दल अद्याप निश्चित माहिती कोणीही दिलेली नाही. त्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येत नसल्याच्या मुद्यावरून ठाकरे …
Read More »देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती,… पण लव्ह जिहादबाबत सजग बेपत्ता महिलांच्या तक्रारीवर आम्ही संवेदनशील
भाजपा नेत्यांकडून वारंवार लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित केला जातो. तसेच लव्ह जिहादविरोधातील कायद्याची मागणीही होते. या पार्श्वभूमीवर राज्यातील बेपत्ता महिलांची वाढती संख्या आणि लव्ह जिहादबाबत विचारणा केली असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न करण्यावर कोणताही आक्षेप नसावा, असं वक्तव्य फडणवीसांनी केलं. ते शनिवारी ३ जून रोजी …
Read More »संजय राऊत यांनी सांगितले ‘त्या’ थुंकण्यामागील सत्य त्र्यंबकेश्वर येथील हिंदू-मुस्लिम प्रकरणावरही केले भाष्य
मागील दोन-तीन दिवस प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे गटाच्या नेत्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ऑन कॅमेराच दोन-तीनदा थुंकले. त्यामुळे राऊत यांच्या थुंकण्यावरूनची चर्चा चांगलीच राजकिय वर्तुळात रंगली आहे. यापार्श्वभूमीवर संजय राऊत यांना त्या थुंकन्यामागचे कारण विचारले असता ते ते म्हणाले, माझ्या जीभेला त्रास होतो. शस्त्रक्रिया झाल्याने …
Read More »३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, प्रतापगड प्राधिकरणची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी
किल्ले रायगडाच्या पायथ्याशी ४५ एकरात शिवसृष्टी उभारण्यासाठी राज्य शासन ५० कोटी रुपयांचा निधी देणार आहे तसेच प्रतापगडाच्या संवर्धनासाठी राज्य शासन प्राधिकरण निर्माण करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडावर झालेल्या ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यात केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, पंढरीच्या आषाढी वारीसाठी टोल माफ रस्त्यांची दुरूस्ती, स्वच्छता-पाणी-आरोग्य सुविधांवर लक्ष द्या- मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करण्यात यावे. यंदा वारीसाठी अधिक गर्दी होऊ शकते. त्यामुळे वारकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. वारीसाठी येणाऱ्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टोल माफ करण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. पंढरीत दर्शनासाठी येणाऱ्या …
Read More »नाना पटोले यांची टीका, … पण अहिल्यादेवींसारखा कारभारही करुन दाखवा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी कधीच द्वेषाचे राजकारण केले नाही
शिंदे-फडणवीस सरकारने अहमदनगरचे नामकरण अहिल्यादेवीनगर करण्याची घोषणा केली, त्याचे काँग्रेस पक्ष स्वागतच करत आहे. पण मुळात या सरकारकडे जनतेला सांगण्यासारखे काहीच नाही म्हणून शहरांची नावं बदलण्याचे काम सुरु आहे. शहराचे नाव तर बदलले पण राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी ज्या पद्धतीने समाजकार्य केले, सर्वधर्म समभावाला घेऊन पुढे गेल्या, त्या विचारांवर शिंदे-फडणवीस …
Read More »पंकजा मुंडे यांच्या त्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,…. विपर्यास मी भाजपाची, पण भाजपा माझा नाही
पंकजा मुंडे, भाजपा माझ्या पाठीशी आहे असंच म्हणाल्या मात्र त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा खुलासा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना स्पष्ट केले. मी भाजपाची आहे, पण भाजपा थोडीच माझा आहे’, असे जाहीर वक्तव्य करून भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आपला उद्ग्वेद व्यक्त केल्यानंतर सर्वत्र चर्चांना उधाण आले. त्यानंतर …
Read More »मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण पुनर्विकास योजनेअंतर्गत शासन निर्णय जारी इमारत पुनर्विकास धोरणाबाबत शासन निर्णय निर्गमित
मागासवर्गीय व्यक्तींना घरे उपलब्ध करून देण्यासाठी मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेअंतर्गत इमारतींचे पुनर्विकास धोरण जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. याबाबतचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय ३१ मे २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांनी त्यांना दिलेल्या भूखंडावर इमारतींचे बांधकाम करुन आता ५० ते …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, गोसीखुर्द जलपर्यटन प्रकल्प २०२४ पर्यंत पूर्ण करा पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध प्रकल्पांना शिखर समितीची मान्यता
राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत विविध पर्यटन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. राज्यात पर्यटनवाढीसाठी मोठा वाव असून प्रत्येक विभागातील पर्यटनस्थळांचा दर्जा वाढवितानाच पर्यटकांच्या सोयीसाठी त्याठिकाणी चांगले रस्ते, दळणवळणाची साधने, निवासाची दर्जेदार व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. सह्याद्री अतिथीगृह …
Read More »
Marathi e-Batmya