Tag Archives: देवेंद्र फडणवीस

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले “हे” महत्वाचे निर्णय वीज प्रकल्प, सहआयुक्त पद निर्मिती, महाप्रितकडून घरे, कामगार विभागासाठी घेतले महत्वाचे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठीकत कोराडी औष्णिक प्रकल्पातून क्रिटीकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्प व तसेच धर्मादाय संस्था कार्यालयात सह आयुक्त पदाची निर्मिती, मागासवर्गीय समाजाला महाप्रितकडून परवडणाऱ्या दारातील घरे, अहमदनगर जिल्ह्यात नवे पशुवैद्यकीय रूग्णालय, बांधकाम कामगारांसाठीच्या नियमात सुधारणा आदी प्रश्नी निर्णय घेण्यात आला आहे. या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, …

Read More »

मोठी बातमी, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील शिखर बँकेतून शासकिय आर्थिक व्यवहार करण्यास मान्यता महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबईतून शासकीय बँकिंग व्यवहार करता येणार

शासकीय कार्यालयांच्या बँकिंग विषयक व्यवहार आणि सार्वजनिक उपक्रम महामंडळे यांच्याकडील निधी गुंतवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई अर्थात शिखर बँकेतून व्यवहार करण्यास या बँकेस पात्र ठरविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे हजर होते. राज्य …

Read More »

नाना पटोले यांचे टीकास्त्र, … भाजपा कोणालाही आरक्षण देणार नाही आरक्षणप्रश्नी फडणवीसांची मराठा व ओबीसी समाजाशी वेगवेगळी विधाने

आरक्षण प्रश्नावर भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस मराठा व ओबीसी समाजाची दिशाभूल करत आहेत. फडणवीस ओबीसी समाजासमोर एक भुमिका मांडतात तर मराठा समाजाबद्दल दुसरी भूमिका मांडतात. आरक्षणाचा प्रश्न फक्त काँग्रेस पक्षच मार्गी लावू शकतो, भारतीय जनता पक्षाला मात्र कोणालाही आरक्षण द्यायचे नाही, आरक्षण संपुष्टात आणणे हीच त्यांची भूमिका आहे, …

Read More »

देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री हवेत; मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात कोणी दिल्या घोषणा ? २०२४ मध्ये तुम्हाला मुख्यमंत्री कोण हवा आहे? बावनकुळेंच्या प्रश्नावर एकच आवाज घुमला.....

एकनाथ शिंदे हे महायुतीचे मुख्यमंत्री असले तरी महायुतीत मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे फडणवीस यांच्यासह अजित पवार गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी अजितदादा गटाने कंबर कसली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं म्हणून भारतीय जनता पक्ष कामाला लागली आहे. तर, शिंदेच हे पुढचे मुख्यमंत्री कसे राहतील यावर …

Read More »

शिंदे गटाचे खासदार ठाम, आपण २२ जागांचीच भाजपाकडे मागणी करायची ठाकरे गटाच्याही जागांवर दावा करणार

शिवसेना कोणाची यावरील निर्णय अद्याप सर्वोच्च न्यायालय आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे प्रलंबित असताना लोकसभा निवडणूकीला आता काही महिन्यांचा अवधी राहिला आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या गटाच्या खासदारांची बैठक झाली. या बैठकीत शिंदे गटाच्या खासदारांबरोबरच विद्यमान ठाकरे गटाच्या खासदारांच्या जागा भाजपाकडे मागणी करायच्याच अशी …

Read More »

…देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केले जातेय आ. प्रविण दरेकर यांचा आरोप

आज आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली. या सभेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वक्तव्य केले. त्याला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका विशिष्ट समाजाचे असल्याने त्यांना टार्गेट केले जातेय, असा आरोप दरेकर यांनी केला. …

Read More »

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी फडणवीसांना समजून सांगा, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा १०० एकरच वावर विकत घेतलं नाही तर भाड्याने घेतलंय, सदावर्ते तुमचाच कार्यकर्ता

आंतरावली सराटे येथील जाहिर सभेसाठी आम्ही १०० एकराचं वावर घेतल्याचं समजताच काही जण आमच्यावर मराठा समाजानेच निवडूण दिलेल्यांकडून आमच्यावर आरोप करायला लागले की, इतका पैसा आला कोठून यांना १० कोटी मिळाले. निवडून दिलेल्या आमदाराने मराठा समाजाचा पैसा खाल्यानेच त्यांना तिकडचं बेसण खाऊन यावं लागलं असा उपरोधिक टोला मनोज जरांगे पाटील …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘जितनी आबादी उतनी भागिदारी’… ओबीसी जागर यात्रेच्या समारोपप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांची काँग्रेसवर टीका

ओबीसींच्या हितांची चिंता जेवढी मोदी सरकारने केली, तितकी आजवर कधीच कोणत्याच सरकारने केली नाही, असे सांगतानाच आज काँग्रेस पक्ष ‘जितनी आबादी उतनी भागिदारी’ असा नारा देत असली तरी एकाच घरातून इतके का प्रधानमंत्री याचे उत्तर देणार का, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. भाजपाच्या ओबीसी जागर यात्रेचा समारोप …

Read More »

शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्री पदाचे त्यांचं स्वप्न स्वप्नच राहणार काहीजण युनोचेही अध्यक्ष म्हणून जाहिर केले तर मला हरकत नाही असे सांगत अजित पवारांना लगावला टोला

राष्ट्रवादी पक्षात अजित पवार यांनी बंड करत भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात सर्वत्र त्यांना मुख्यमंत्रीपद मिळणार अशी जोरदार चर्चा सुरु झाली. अजित पवारांच्या अगोदर स्वपक्षाला खिंडार पाडत भाजपासोबत घरोबा केलेले एकनाथ शिंदे सध्या मुख्यमंत्री आहेत. अशात भाजपा नेतृत्व लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर, शिंदेंना हटवून पवारांना मुख्यमंत्री पदी बसवणार का? असा प्रश्नही …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली जनजाती सल्लागार परिषेदची बैठक

केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास मान्यता दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य जनजाती सल्लागार परिषदेमध्ये या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यासोबतच राज्याच्या अनुसूचित क्षेत्राच्या पुनर्रचनेबाबत, लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद, आदिवासी जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये प्रकल्प कार्यालय सुरू करणे आदी विविध विषयांवर या बैठकीत चर्चा …

Read More »