मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला असून, केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा असली तरी राज्य शासनाने मराठी भाषा संवर्धनासाठी विविध महत्त्वाकांक्षी उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे, अशी माहिती उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. म.वि.प. नियम ९२ अन्वये अर्धा तास चर्चेत …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, कोल्हापूरच्या हेरे सरंजाम इनाम जमिनींचा प्रश्न निकाली भोगवटादार वर्ग २ जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतर; रूपांतर मूल्य पूर्णपणे माफ
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील हेरे गावातील सरंजाम इनाम जमिनींचा तब्बल ५५ वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न राज्य शासनाने विशेष बाब म्हणून निकाली काढला असून, भोगवटादार वर्ग २ च्या जमिनींचे कोणतेही रूपांतर मूल्य न आकारता भोगवटादार वर्ग १ मध्ये रूपांतर करण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले. …
Read More »प्रकाश आबिटकर यांची माहिती, सोनोग्राफी व आयव्हीएफ केंद्रांवरील गैरप्रकार रोखण्यासाठी मकोका कायदा विशेष पथकाद्वारे धडक मोहीम सुरू
राज्यात सोनोग्राफी व आयव्हीएफ केंद्रांद्वारे होणारे गैरप्रकार तसेच गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन रोखण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांच्या तपासणीची धडक मोहीम राबविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली. राज्यात विनापरवाना सुरू …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, अवैध डान्स बार रोखण्यासाठी पोलीस कायद्यात दुरुस्ती करणार विधानसभेत दिली माहिती
राज्यात डान्स बारवर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या विद्यमान कायद्यातील पळवाटा बंद करण्यासाठी राज्य सरकार महाराष्ट्र पोलीस अधिनियमात दुरुस्ती करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. या दुरुस्तीनंतर डान्स बार चालविण्यासाठी महाराष्ट्र डान्स बार कायद्यांतर्गतच परवाना घेणे बंधनकारक राहील. पोलीस कायद्यांतर्गत केवळ सादरीकरण (परफॉर्मिंग लायसन्स) घेऊन डान्स बार चालविण्याची प्रथा …
Read More »प्रकाश आबिटकर यांचे निर्देश,खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक अतिरिक्त शुल्क घेतल्यास कारवाई
राज्यातील खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक असून त्यानुसारच रुग्णांकडून देयके आकारावीत. तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नियमबाह्य पद्धतीने रुग्णांकडून अतिरिक्त पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात येईल. प्रसंगी संबंधित रुग्णालयांना ब्लॅकलिस्टही केले जाईल, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य बापूसाहेब पठारे यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली. त्यावरील …
Read More »त्या शोकप्रस्तावातील चुकीच्या वाचनाची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून दिलगिरी तांत्रिक त्रुटींमुळे चुका झाल्याचा विधानसभेत खुलासा
विधानसभेत पद्मविभूषण तथा प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनाच्या शोकप्रस्तावाचे वाचन करताना झालेल्या शब्दोच्चारातील चुकांवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी सभागृहात दिलगिरी व्यक्त केली. शब्दोच्चारातील चुकांमुळे राहुल नार्वेकर यांच्यावर राज्यभर टीकेची झोड उठल्यानंतर मराठी भाषेबद्दल आपल्याला प्रचंड अभिमान असून, शोकप्रस्तावाच्या वाचनावेळी झालेल्या चुका या केवळ तांत्रिक कारणांमुळे झाला असल्याची …
Read More »बाबासाहेब पाटील यांची माहिती, कर्जमुक्ती योजनेचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना होणार मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ देऊन न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पूर्वीच्या कर्जमाफी योजनेत लाभ मिळालेल्या १२ लाख ७१ हजार शेतकऱ्यांनाही यंदाच्या योजनेत समाविष्ट करण्याबाबत शासन सकारात्मक असून, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत लवकरच निर्णय घेतला …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, प्रत्येक पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी स्वतंत्र युनिट अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून एकत्रित कार्यपद्धती कार्यरत
राज्यातील अमली पदार्थांची विक्री, तस्करी आणि सेवन रोखण्यासाठी राज्य शासनाकडून व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. अमली पदार्थ व्यापार व सेवनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कार्यवाहीसाठी स्वतंत्र युनिट उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. राज्यातील अमली पदार्थ विक्री व सेवनासंदर्भात सदस्य सुनील प्रभू …
Read More »छगन भुजबळ यांची माहिती, शिवभोजन केंद्रांना गॅस पुरवठ्याबाबत शासन सकारात्मक बंद केंद्रे लवकरच सुरू करणार
शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासन सकारात्मक असून, काही कारणांमुळे बंद पडलेली शिवभोजन केंद्रे लवकरच पुन्हा सुरू करण्यात येतील, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानपरिषदेत दिली. छगन भुजबळ पुढे बोलताना म्हणाले की, राज्यातील विशेषतः पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅस पुरवठा करण्याबाबत …
Read More »राज ठाकरे यांची टीका, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का ? विधानसभा अध्यक्षांनी मांडलेल्या शोकप्रस्तावावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांची जळजळीत प्रतिक्रिया
पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्या आधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी ? असा खोचक सवाल मनसे प्रमुख राज …
Read More »
Marathi e-Batmya