राज्यातील कर्करोगग्रस्तांना दर्जेदार उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी सर्वसमावेशक कर्करोग सेवा धोरण निश्चित करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन (महाकेअर फाऊंडेशन – MAHACARE Foundation) कंपनी स्थापन करण्यास तसेच या माध्यमातून राज्यभरातील १८ रुग्णालयांतून कर्करोगाशी निगडीत विशेषोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »शासकीय रुग्णालयांमध्ये उत्तम आहार पुरवठा व स्वच्छतेबाबत दक्षता घ्या सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश
राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना उत्तम दर्जाचा पौष्टिक आहार पुरवला गेला पाहिजे. तसेच रुग्णसेवा आणि स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही कुचराई झाल्यास ती खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. आरोग्यसेवा आयुक्तालय, मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागांतर्गत असलेल्या आरोग्य संस्थांमधील …
Read More »प्रकाश आबिटकर यांचे आदेश, पूरग्रस्त भागात आरोग्य सेवा तात्काळ उपलब्ध करा आरोग्य केंद्रात पुरेसा औषध साठा उपलब्ध ठेवावा. आपत्कालीन स्थितीत १०८, १०२ रुग्णवाहिका सज्ज ठेवाव्यात
राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत आरोग्य सेवा सुविधा तत्काळ उपलब्ध ठेवाव्यात, असे आदेश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य भवन येथे यासंदर्भात राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीला अकोला, छत्रपती संभाजीनगर, नाशिक व …
Read More »शिवसेनेच्या सर्व मंत्री, आमदारांचे एक महिन्याचे वेतन अतिवृष्टीग्रस्तांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेने मोठा मदतीचा हात दिला आहे. शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांचे तसेच आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीस देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केला आहे. नैसर्गिक आपत्तीत शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना मदत करण्यात कधीही हात आखडता घेणार नाही असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले …
Read More »एकनाथ शिंदे यांचे मत, ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान वर्षभर सुरू राहावे ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यस्तरीय शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून देशभरात ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. हे अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत म्हणजेच पंधरवडापुरतेच मर्यादित न ठेवता ते वर्षभर सुरू ठेवावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेश येथील धार …
Read More »प्रकाश आबिटकर आणि जयकुमार गोरे यांचे आदेश, कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करा राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी कार्यवाही करा
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी परिचारिका, एएनएम आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समकक्ष पदांवर समावेश करून त्यांना नियमित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे निर्देश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. या विषयावर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या समवेत संयुक्त बैठकीत ते …
Read More »आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतली अवयवादानाची शपथ अवयवदान पंधरवड्यास सुरुवात आजपासून राज्यात जनजागृतीपर विविध उपक्रम
राज्यातील अवयवदानाचे प्रमाण वाढावे व अवयवदानाच्या प्रतीक्षेतील रुग्णांना नवजीवन मिळावे यासाठी आजपासून विविध उपक्रमांनी अवयवदान पंधरवडा साजरा होत आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्वत: पुढाकार घेत अर्ज भरून अवयवादानाची शपथ घेतली आणि या अभियानाचा शुभारंभ केला. राज्यातील जनतेने या अभियानामध्ये सहभागी होऊन अवयवदानाची शपथ घ्यावी, …
Read More »आरोग्य क्षेत्रातील पीएचएफआय, आयएमएमएएसटी यांच्यासोबत महाराष्ट्र शासनाचा सामंजस्य करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित
महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम व प्रशिक्षित करण्याच्या दृष्टीने तसेच आरोग्य क्षेत्रातील दर्जा व क्षमता वृद्धीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सार्वजनिक आरोग्य विभाग आणि पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया (पीएचएफआय) आणि इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अॅन्ड मिनिमल अॅक्सेस सर्जरी ट्रेनिंग (आयएमएमएएसटी) या दोन जागतिक …
Read More »मनसुख मांडविया यांचे आश्वासन, आरोग्य सेवा योजनेच्या दरांमध्ये सुधारणा करणार मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला आश्वासन
केंद्रीय आरोग्य सेवा योजनेच्या (CGHS) दरांमध्ये सुधारणा करण्याची बाब केंद्र सरकारच्या विचाराधीन असून लवकरच त्यात सुधारणा केली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या …
Read More »प्रकाश आबिटकर यांची माहिती, १०२ क्रमांक रुग्णवाहिका सेवा सुरळीत, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन… विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिली माहिती
राज्यात आरोग्य सेवेसाठी १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा उपलब्ध आहे. या सेवेची सर्व देयके आणि चालकांचे वेतन अदा केल्याने ही सेवा सुरळीत सुरू असल्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य शिवाजीराव गर्जे यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री …
Read More »
Marathi e-Batmya