मुंबईसह राज्यातील सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांची घरे उपलब्ध करण्याकरीता गृह निर्मितीचा वेग वाढविण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ‘म्हाडा’ मुंबई मंडळाच्या घरांच्या लॉटरीची सोडत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काढण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत …
Read More »म्हाडा प्राधिकरणांतर्गत इमारत पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध करून देणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत इमारतींची पुनर्बांधणी करण्यासाठी निधीची कमतरता असल्यास त्याचा वित्त आणि गृहनिर्माण विभागाच्या मंत्री आणि सचिवांच्या स्तरावर बैठक घेऊन आढावा घेण्यात येईल. त्यानंतर म्हाडा प्राधिकरण अन्यथा शासनामार्फत पुढील अधिवेशनात तरतूद करून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत सांगितले. …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, पात्र गिरणी कामगारांसाठी घरकुलांची निर्मिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित
गिरणी कामगारांची पात्रता निश्चित करून पात्र कामगारांना घरे देण्यासाठी शासनामार्फत जे निर्णय घेणे आवश्यक असेल ते घेतले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. विविध योजनांमधून घरे उपलब्ध होत असून सर्व पात्र गिरणी कामगारांना घरे मिळण्यासाठी अधिकच्या घरकुलांची निर्मिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण …
Read More »निर्णय कोणासाठी? मालकी म्हाडाच्या मुंबई मंडळाची पण पुनर्विकासाची परवानगी आरआर बोर्डाची
मुंबईतील म्हाडाच्या अखत्यारीत असलेल्या मुंबई गृहनिर्माण मंडळ, मुंबई दुरूस्ती व पुर्नरचना मंडळ आणि झोपडपट्टी सुधार मंडळाच्या एकेका कारभाराचे किस्से एकूण अचंबित व्हायला होते. गरजेपेक्षा एफएसआय वापरणे किंवा दुसऱ्या एका जागेचा एफएसआय भलत्याच प्रकल्पाला वापरणे सारखी धक्कादायक प्रकरणी अनेकवेळा बाहेर आली. मात्र यातच आता नवी एका प्रकरणाची भर त्यात पडली असून …
Read More »म्हाडाला द्यायचे होते ९८ हजार चौ. फु. जागेचे बांधकामः पण मिळाले ४० हजार चौ.फुट चटई निर्देशांक घोटाळ्यात म्हाडाला १४५ कोटी रूपयांचा विकासकाकडून चुना
दादर येथील लोकमान्य नगर प्रियदर्शनी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकास प्रकल्पात राज्य सरकार आणि पर्यावरण खात्याने निर्धारीत केलेल्या सरप्लस अर्थात अतिरिक्त जागेसह चटई निर्देशांक क्षेत्रफळाचे जवळपास ९८ हजार चौ.फुटाचे बांधकाम देणे अपेक्षित असताना विकासकाने अवघ्या ४० हजार चौ.फुटाचे बांधकाम म्हाडाला हस्तांतरीत केल्याने आणि त्याकडे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने तब्बल १४५ कोटी …
Read More »
Marathi e-Batmya